साऊथ इंडियन पदार्थ अनेक घरी नाष्टासाठी बनवले जातात. यातही कुरकुरीत डोसा कित्येकजणांच्या आवडीचा असतो. त्यामुळे रविवारच्या सकाळी सकाळच्या नाष्टात डोसा बनवला जातो. पण, अनेकदा डोशांच्या प्लॅन फिसकटतो. कधी बॅटरचं पातळ होते तर कधी जाड. काही वेळा तर डोसाच तव्याला चिकटून राहतो. यामुळे अनेकजणी घरी डोसा बनवण्याच्या फंद्यातच पडत नाही. पण, आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी एखाद्या अण्णासारखा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा याच्या काही सोप्या टिप्स सांगणार आहोत.
डोसा कुरकुरीत होण्यासाठी टिप्स –
- डोशाचे पीठ रात्रभर उबदार ठिकाणी ठेवून आंबवायला हवे. पीठ चांगल्या प्रकारे आले तरच डोसा कुरकुरीत होऊ शकतो.
- डोसा तयार करण्यासाठी जो तवा वापरणार आहात, तो पूर्णपणे स्वच्छ आहे का नाही याची खात्री करावी. अनेकदा डोसा कुरकुरीत होण्याचे कारण खराब तवा हे कारण असू शकते.
- डोसा टाकण्याआधी तवा चांगला तापला आहे का नाही? याची खात्री करावी.
- डोसा कुरकुरीत होण्याआधी तांदूळ आणि डाळीचे प्रमाण योग्य घ्यावे. यात तुम्ही जर ३ वाटी तांदूळ घेतले असतील तर डाळ 1 वाटी घ्यावी.
- याशिवाय डोशाच्या पिठात शिजवलेला भात घ्यावा. या टिपमुळे डोसा कुरकुरीत होतो.
- डोसा कुरकुरीत होण्यासाठी सर्वात महत्त्वाचा असतो तो तवा. तवा उत्तम क्वॉलिटीचा असेल तर डोसा कुरकुरीत होतो. यासाठी तुम्ही लोखंडी किंवा नॉन- स्टिक पॅन वापरू शकता.
- डोश्याचे पीठ जास्त घट्ट नसावे, कारण जास्त घट्ट पीठामुळे डोसा कुरकुरीत होत नाही.
- डोसा तयार करताना तवा आधीच गरम करणे गरजेचे असते. तवा गरम असल्यास पीठ तव्याला चिकटून राहत नाही आणि डोसा कुरकुरीत होतो.
- गरम तव्यावर डोसा टाकण्याआधी तव्यावर पाणी शिंपडून घ्यावे आणि स्वच्छ कापडाने पुसावे. या ट्रिकमुळे डोसा चांगला शिजला जातो.
- डोश्याचे पीठ फ्रीजमध्ये ठेवले असेल तर रूम टेंमरेचरवर आणून मगच त्याचा वापर करावा. असे केल्याने डोसा कुरकुरीत होतो.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde