Thursday, April 18, 2024
घरमानिनीKitchenRecipe : चटपटीत आणि पौष्टिक मूग डाळीचा डोसा

Recipe : चटपटीत आणि पौष्टिक मूग डाळीचा डोसा

Subscribe

मूग डाळ पचायला हलकी आणि आरोग्यदायी असते. आजारपणात आणि सकाळच्या आहारात मूग डाळीचे सूप, मूग डाळीचे वरण आणि मगाचे ठोसे खाण्याचा सल्ला डॉक्टर नेहमी आपल्याला देतात. आज आम्ही तुम्हाला मूग डाळीसा डोसा कसा बनवायचा हे सांगणार आहोत.

साहित्य :
  • 1 मोठी वाटी हिरवी मूग डाळ (5 ते 6 तास भिजवलेले)
  • 1 चमचा जिरे
  • 1 आल्याचा तुकडा
  • 1 लसूण
  • हिरव्या मिरच्या आवश्यकतेनुसार
  • मीठ चवीनुसार
  • पाणी आवश्यकतेनुसार

कृती :

- Advertisement -

 

- Advertisement -

 

  • सर्वप्रथम डोश्याचे पीठ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक मोठी वाटी भिजवलेले हिरवे मूग, आल्याचा तुकडा, जिरे, मिरच्या, लसूण वाटून घ्या.
  • त्यानंतर या मिश्रणामध्ये आवश्यकतेनुसार पाणी मिक्स करा.
  • तयार डोश्याचे पीठ एका भांड्यात काढा आणि त्यात आवश्यकतेनुसार मीठ मिक्स करा.
  • गॅसच्या मध्यमआचेवर एक पॅन गरम करायला ठेवा, पॅन गरम झाल्यानंतर तव्यावर तेलांचे काही थेंब सोडा. आणि त्यावर डोसा तयार करा.
  • डोश्याला लालसर रंग येईपर्यंत शिजवून घ्या.
  • तयार मूग डोसा सॉस किंवा नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

हेही वाचा :

Paratha : मुलांच्या टिफीनमध्ये द्या दुधी पराठा

- Advertisment -

Manini