घरताज्या घडामोडीआपल्या राशीनुसार करा पेहराव

आपल्या राशीनुसार करा पेहराव

Subscribe

प्रत्येकाला फॅशनची आवड असते. पण काहीजण मात्र याला अपवाद असतात. याचे कारण असते त्यांची राशी.

प्रत्येकाची आपली अशी एक वेगळी स्टाईल असते. त्या स्टाईलमधून प्रत्येक व्यक्ती आपलं सौंदर्य फुलवण्याचा प्रयत्न तर करतेच पण तुमचा तो लूक तुमच्याबद्दलही खूप काही सांगत असतो. मात्र, तुम्हांला हे माहित आहे का की आपल्यापैकी बऱ्याच व्यक्ती या त्यांच्या जन्मराशीनुसार पेहराव करत असतात. यामुळेच काहीवेळा त्या आकर्षक दिसतात. तर काहीवेळा त्यांनी केलेला अगदी साधा पेहरावही त्यांच्यावर खुलून दिसतो. जाणून घेऊया अशाच काही राशी आणि त्यांच्याशी संबंधित पेहरावांबद्दल.

- Advertisement -

मेष

मेष ही राशीचक्रातील पहीली राशी आहे. या राशीच्या व्यक्तींमध्ये उपजतच नेतृत्वगुण असतात. राजकारण मिडिया, कायदा या क्षेत्रांमध्ये मेष राशी अग्रसेर असते. साहजिकच त्यांचा हा नेतृत्वगुण त्यांच्या व्यक्तिमत्वात ठासून भरलेला असतो. त्यामुळे या व्यक्ती पेहरावाबद्दल, लूक्सबद्दल अलर्ट असतात. त्यांचा हा गुण त्यांच्या पेहरावातून दिसत असतो. मेष राशीच्या व्यक्तींना लाल, काळा, निळा या तिन रंगाचे आकर्षण असते. काळा कुर्ता, काळी साडी, काळे शर्ट ,काळी पॅंट हा यांचा आवडता पेहराव. टेंड्रींग फॅशन करणे यांना आवडतं. नवीन फॅशनचा यांना सतत ध्यास असतो. यामुळे या व्यक्ती फॅशनच्या बाबतीत अप टू डेट असतात.

- Advertisement -

वृषभ
या राशीच्या व्यक्ती संयमी व महत्वाकांक्षी असतात. त्यांचा हा स्वभाव त्यांच्या व्यक्तीमत्वातून व्यक्त होत असतो. वृषभ राशीच्या व्यक्तींना ठराविक रंगच आवडत असतात. फिकट रंग त्यांना नेहमीच आकर्षित करतो. यामुळे राखाडी, काळा, सफेद, निळा या रंगाच्या कपड्यांचे त्यांच्याकडे कलेक्शन असते.

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्ती या कष्टाळू, महत्वाकांक्षी आणि खेळकर असतात. त्यामुळे त्यांची फॅशनची कल्पना अफाट असते. ट्रेंडी पेहरावाचे ते चाहते असतात. त्यामुळे खूप नाही पण त्यांच्या कपाटात सिलेक्टेड कपडे असतात. फार फाफट पसारा त्यांना आवडत नाही. पण एक मात्र आहे कि या व्यक्तींना बूट, गॉगल्स आणि महागड्या वस्तूंचा संग्रह करण्याचा छंद असतो.

कर्क
या राशीच्या व्यक्तींना निळा, सफेद, हिरवा रंग अधिक आवडतो. फॅशन ट्रेंड पेक्षा मिळेल ते घालायला यांना अधिक आवडतं. त्यामुळे अनेकवेळा यांचा पेहराव त्यांना मजेशीर दिसतो. पण तरीही कर्क राशीची व्यक्तीं त्यातून आनंद मिळवतात. दुसरे काय बोलतील यापेक्षा आपल्याला काय आवडतं याला त्या प्राधान्य देतात.

सिंह
सिंह राशीच्या व्यक्ती आक्रमक, रोमेंटीक, कलाप्रेमी असतात. फॅशनच्या बाबतीत अलर्ट. आपल्याला काय चांगले दिसेल. याचे त्यांना ज्ञान असते. त्यामुळे रंगाला शोभेल अशा रंगाचे कपडे ते निवडतात. एकाच रंगाचे अनेक टी शर्ट किंवा कुर्ती यांच्या कपाटात असतात. फिटींग पेक्षा सैल कपडे त्यांना भावतात. त्यातही हिंदुस्थानी पेहराव त्यांच्या पसंतीचा.

कन्या
कन्या राशीला चमकधमक आवडते. त्यामुळे कपड्यांचे हे विशेष शौकिन असतात. कामाच्या स्वरुपावर आधारित पेहराव करण्याकडे यांचा कल असतो. त्यामुळे कपड्यांचे बरे कलेक्शन यांच्याकडे असते.

तूळ
व्यक्ती म्हणजे स्वच्छंद पक्षी. फॅशन पेक्षा आरामशीर कपडे घालण्याला यांचे प्राधान्य असते. फिकट रंगाच्या छटा यांना खुणावतात. साध राहणीमान ही यांची खासियत. पण एखाद्यावेळी हटके लूक करतात. जो चारचौघात उठून जरी दिसत नसला तरी त्यांना मात्र आनंद देऊन जातो.

वृश्चिक

वृश्चिक राशीच्या व्यक्तींचा चारचौघात आकर्षक दिसण्याकडे जास्त कल असतो. सिल्क, सॅटीन आणि मखमलीचे कपडे यांना प्रिय असतात. चामड्याच्या वस्तू बाळगणे यांना आवडतं. त्यामुळे यांनी काहीही घातले तरी त्यांचे व्यक्तिमत्व त्यात खुलून दिसते.

धनु
धनु राशीला चमकधमक आवडते. त्यामुळे कपड्यांचे हे विशेष शौकिन असतात. कामाच्या स्वरुपावर आधारित पेहराव करण्याकडे यांचा कल असतो. त्यामुळे कपड्यांचे बरे कलेक्शन यांच्याकडे असते.

मकर
मकरराशीच्या व्यक्ती शिस्तप्रिय असतात. त्यामुळे पेहरावाच्या बाबतीतही त्या परफेक्टनेसकडे लक्ष देतात. हिंदुस्थानी पेहरावात त्या सहज वावरतात. पण कधीतरी त्यांना पाश्चिमात्य कपड्यांचा मोह होतो. त्यातही त्या खुलुन दिसतात.

कुंभ
साधा पण चारचौघात उठून दिसेल असा पेहराव करण्याकडे यांचा कल असतो. घट्टपेक्षा सैल आरामशीर कपडे घालणे यांना आवडते. फिकट रंग यांना खुणावतो व उठून दिसतो. फार फॅशन यांना आवडत नाही.

मीन

मीन राशीच्या व्यक्तींना साध राहणीमान आवडतं. प्रसंगानुरुप यांची फॅशन बदलते. कपड्यांपेक्षा विविध प्रकारच्या बूट्स घालण्याची यांना हौस. यामुळे यांच्याकडे सिलेक्टेड कपडे असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -