तुळशीच्या सुकलेल्या पानांमुळे बदलेल तुमचे भाग्य

हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपट्याला अत्यंत पूजनीय मानले जाते. अशी मान्यता आहे की, तुळशीच्या रोपट्याला देवी लक्ष्मी स्वरूप मानले जाते. हिंदू धर्मात प्रत्येक घरामध्ये तुळशीच्या रोपट्याची पूजा केली जाते. वास्तू शास्त्रामध्ये देखील तुळशीच्या रोपट्याला अत्यंत शुभ मानले जाते. तुळशीच्या रोपट्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. ज्योतिष शास्त्रातही तुळशीच्या सुकलेल्या पानांसंबधित काही खास उपाय सांगण्यात आले आहेत. ज्यामुळे तुम्ही आपलं नशीब बदलू शकता.

  • धनवृद्धीसाठी करा हे उपाय


धनवृद्धीसाठी तिजोरीमध्ये किंवा पैसे ठेवण्याच्या बॉक्समध्ये तुळशीची सुकलेली पानं आणि लाल कपड्यामध्ये बांधून ठेवा. यामुळे देवी लक्ष्मींचा आर्शिवाद प्राप्त होतो आणि धनवृद्धी देखील होते.

  • मुलांच्या अभ्यासासाठी


जर मुलं अभ्यासामध्ये कमजोर असतील तर त्यांच्या पुस्तकांमध्ये तुळशीची सुकलेली पानं ठेवा. यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांचे लक्ष एकाग्र होते.

  • सकारात्मक ऊर्जेसाठी


तुळशीच्या सुकलेल्या पानांना गंगाजलामध्ये टाकून ते पाणी घरात शिंपडल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते.

  • श्रीकृष्णाची होईल कृपा


तुळशीच्या सुकलेल्या पानांना पाण्यामध्ये टाकून श्रीकृष्णांना स्नान घालावे. यामुळे श्रीकृष्णांची कृपा प्राप्त होते.

 


हेही वाचा :