Saturday, September 30, 2023
घर मानिनी Health तुम्ही सकाळी उठल्यानंतर कॉफी पिता? तर आधी हे वाचा

तुम्ही सकाळी उठल्यानंतर कॉफी पिता? तर आधी हे वाचा

Subscribe

आपल्यापैकी बहुतांशजण दिवसाची सुरुवात गरम पाणी पितात. तर काही लोक लिंबू पाणी पितात. अथवा काहीजण एक्सरसाइज करतात. मात्र यामध्ये सर्वात सामान्य गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर बहुतांशजण एनर्जीसाठी कॉफी पितात. काही लोकांचे असे मानणे असते की, जो पर्यंत कॅफेनचे सेवन करत नाही तो पर्यंत त्याचा दिवस सुरु होत नाही.(Drinking Coffee in morning)

मात्र एक्सपर्ट्सच्या मते, तुम्ही उठल्यानंतर एक तास तरी कॉफीचे सेवन करू नका. तुम्हाला वाटत असेल की, कॉफीमुळे तुम्हाला उर्जा मिळते किंवा झोप उडते तर कॉफी प्यायल्याने त्याचा विरुद्ध परिणाम होऊ शकतो.

- Advertisement -

काय म्हणतात एक्सपर्ट्स
दिवसा आपला मेंदू एडेनोसिन नावाचे एक रसायन उत्पादन करते, जे झोपण्यास प्रोत्साहन देतात. जसे-जसे तुम्ही दीर्घकाळ जागे राहता तेव्हा हे रसायन वाढले जाते आणि तुम्हाला झोप येते असे जागणवण्यास मदत करते.

- Advertisement -

कॉफी पिण्याची योग्य वेळ
कॉफी पिण्याच्या योग्य वेळेबद्दल जेव्हा बोलले जाते तेव्हा सकाळी उठल्यानंतर कॉफी पिऊ नये. कारण जेव्हा आपण झोपेतून उठतो तेव्हा कोर्टिसोलचा स्तर उच्च असतो. त्यामुळे कोर्टिसोलचा स्तर आधीपासूनच अधिक असेल तर कॅफेन याच्या विरोधात काम करते. एक्सपर्ट्स कॉफी दुपारी 2 नंतर पिण्याचा सल्ला देतात.


हेही वाचा- फास्ट फूडमुळे फक्त वजनचं नाही वाढतं तर हे बॉडी पार्ट्स होतात डॅमेज

- Advertisment -

Manini