Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीTeeth : चहामुळे दातांवर काय परिणाम होतो?

Teeth : चहामुळे दातांवर काय परिणाम होतो?

Subscribe

हुडहुडी भरणारी थंडी आणि हातात गरमा-गरम चहा किंवा कॉफी म्हणजे एक वेगळेच समीकरण आहे. वातावरणात गारवा असल्याने या दिवसात गरम पेयांचे जास्त सेवन केले जाते. पण, कॉफी, चहासारखे गरम पेये दातांचे आरोग्य बिघडवतात यासह दातांचे सौंदर्य कमी करतात. चहा-कॉफीच्या सेवनाने दातांवर पिवळा थर जमा होतो, ज्यामुळे दात खराब दिसतात. याशिवाय तोंडाला वास येतो. थंडीच्या दिवसात दातांची विशेष काळजी घ्यावी लागते, कारण गरम पेये प्यायल्याने दात खराब होतात. याशिवाय आपण थंडीच्या दिवसात कमी पाणी पितो. याचाही दातांवर परिणाम होऊन दात खराब होतात.

काहींना दिवसभरात अनेकवेळा चहा प्यायची सवय असते. काहींच्या दिवसाची सुरूवात चहाशिवाय सुरू होत नाही. पण, सकाळी एक वेळ चहा घेणे ठिक आहे. पण, चहासाठी कारणे शोधणारी माणसे तुम्ही पाहिली असतील. या चहाच्या अतिसेवनाने दातांवर गंभीर परिणाम होतो. जाणून घेऊयात, चहामुळे दातांवर काय परिणाम होतो?

दातांचा रंग –

जास्त प्रमाणात चहा पित असाल तर दातांचा रंग फिकट होऊ शकतो. दात पिवळे होतात, जे लाजिरवाणी गोष्ट ठरवते. दातांचा रंगचहातील टॅनिन नावाचा घटक कारणीभूत ठरतो. या टॅनिनमुळे दातांच्या वरच्या पृष्ठभागावर पिवळसरपणा किंवा डाग दिसतात.

तीव्र वेदना –

गरमा गरम चहा पिण्याची अनेकांना सवय असते. पण, जास्तच गरमा गरम चहा पिण्याच्या सवयीमुळे दातांच्या वरच्या थराचे नुकसान होते. या थराला इनेमल असे म्हटले जाते. यामुळे संवेदनशीलता वाढते आणि जेव्हा तुम्ही काही थंड किंवा गरम खाता तेव्हा दातांमध्ये तीव्र वेदना जाणवतात.

तोंडाची दुर्गंधी –

जास्त चहा प्यायल्याने तोंडाची दुर्गंधी सुरू होते. खरं तर, तोंडाची स्वच्छता योग्यरित्या न केल्याने तोंडात बॅक्टेरिया वाढतात आणि तोंडाला वास येऊ लागतो.

दातांमध्ये पोकळी –

दिवसातून अनेकवेळा चहा प्यायल्याने दातांमध्ये पोकळी निर्माण होते. याशिवाय जर तुम्ही चहामध्ये जास्त साखर टाकत असाल तर ते अधिक घातक ठरू शकते. दातांमध्ये पोकळी तर होईलच शिवाय आरोग्यालाही हानी पोहोचेल.

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

Manini