Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Health उभं राहून पाणी पिणे म्हणजे 'या' आजारांचा धोका

उभं राहून पाणी पिणे म्हणजे ‘या’ आजारांचा धोका

Subscribe

जेव्हा कधी आपल्याला तहान लागते तेव्हा आपण पाण्याची बॉटल किंवा ग्लास घेऊन पाणी पितो. घाईघाईत पाणी पिणे सुद्धा आरोग्यासाठी समस्या उद्भवू शकते. तुम्हाला तुमच्या आजी-आजोबांनी सांगितलेच असेल ना, उभं राहून पाणी पिऊ नये. याकडे तुम्ही किती लक्ष देता? तुम्ही सुद्धा उभं राहून पाणी पित असाल तर ही सवय सोडा.

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या एका रिसर्चनुसार उभं राहून पाणी प्यायल्याने आपल्या शरीरात योग्य पद्धतीने न्युट्रिएंट्स म्हणजेच पोषक तत्व मिळत नाहीत. कारण उभं राहून पाणी प्यायल्याने तोंडातून ते वेगाने खाली जाते. अशातच फुफ्फुसं आणि हृदयाला सुद्धा नुकसान पोहचते. त्याचसोबत यामुळे फूड आणि विंड पाइपमध्ये होणारा ऑक्सिजनचा पुरवठा ही थांबतो.

- Advertisement -

या व्यतिरिक्त आयुर्वेदानुसार उभं राहून पाणी प्यायल्याचे परिणाम लगेच दिसून येत नाहीत. पण जसं जसं तुमचे वय वाढते तेव्हा शरिरात समस्या येण्यास सुरुवात होते. यामुळे पचनाची समस्या, हाडं कमजोर होणे, किडनी इंन्फेक्श, फुफ्फुसाला सूज येणे आणि ऑक्सिजनचा स्तर घसरणे.

- Advertisement -

अशातच तुम्ही सुद्धा असे करत असाल तर थांबा. उभं राहून पाणी पिण्याची सवय तुमच्या हाडांवर ही परिणाम करु शकते. खरंतर सांध्यांमधअये द्रवपदार्थ नसल्याने दुखण्यासोबत अशक्तपणाही तुम्हाला येऊ शकतो. हाडं कमकुवत झाल्याने सांधेदुखी आणि गुडघे दुखीची ही समस्या उद्भवू शकते.


हेही वाचा- Artificial Sweeteners चा अधिक वापर आरोग्यासाठी ठरेल धोकादायक

- Advertisment -

Manini