आजकाल बहुतांश लोक खुप तास मोबाईल किंवा लॅपटॉपवर काम करतात. त्यामुळे डोळ्यासंबंधित समस्या उद्भवू लागतात. स्क्रिनचा अधिक वापर केल्याने डोळे ड्राय होण्याची समस्या वाढली जाते. खरंतर जेव्हा आपण काम करतो तेव्हा दीर्घकाळ आपल्या पापण्या हलवत नाहीत आणि सातत्याने स्क्रिनकडे पाहतो. अशातच डोळ्यांमधील पाणी सुकते. असे झाल्यास डोळे दुखणे, सूज येणे अशा समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या डाएटमध्ये काही अशा फूड्सचा समावेश करा जे तुम्हाला ड्राय आइजच्या समस्येपासून दूर ठेवतील.
-फॅटी फिश
डोळ्यांच्या या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही आपल्या डाएटमध्ये फिशचा समावेश करू शकता. यामध्ये असलेले ओमेगा-3 फॅटी अॅसिड तुम्हाला सूज येण्याच्या समस्येपासून दूर ठेवते. यामुळे तुम्ही टूना, सॅल्मन, हेरिंग असे मासे खा.
-हिरव्या पालेभाज्या
हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने व्हिटॅमिन सी मिळते. या भाज्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी हेल्दी ठेवण्यास फायदेशीर ठरतात. डोळ्यांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही तुमच्या डाएटमध्ये हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा.
-नट्स
पोषक तत्त्वांनी भरपूर असलेले नट्स तुम्हाला डोळे ड्राय होण्याच्या समस्येपासून दूर ठेवतात. यामध्ये व्हिटॅमिन-ई आणि ओमेगा-3 फॅटी अॅसिड असते. जे डोळ्यांमध्ये अश्रू तयार करतात. त्याचसोबत ड्राय डोळ्यांच्या समस्येपासून दूर राहण्यासाठी तुम्ही डाएटमध्ये शेंगदाणे, आक्रोड, काजू खा.
-बीन्स
बीन्समध्ये पोषक तत्त्वे असतात. यामध्ये प्रोटीन, फायबर, जिंक, फोलेट सारखी पोषक तत्त्वे असतात. ही तत्त्वे तुम्हाला डोळ्यांच्या नुकसानीपासून दूर ठेवतात. बीन्स खाल्ल्याने ड्राय आइजच्या समस्येपासून दूर राहता येते.
हेही वाचा- Retinol Deficiency पासून दूर राहण्यासाठी खा ‘हे’ फूड्स