नेलपॉलिश लावणे प्रत्येक महिलेला आवडते. त्यामुळे विविध रंगाच्या नेलपॉलिश खरेदी केल्या जातात. मात्र कधीकधी त्या वापरल्यानंकर सुकतात. अशातच्या त्या पुन्हा कशा वापरायच्या असा प्रश्न पडतो. त्यामुळे पुढील काही ट्रिक्स वापरून तुम्ह ती पुन्हा वापरू शकता.
-गरम पाणी
सुकलेली नेलपॉलिश पुन्हा वापरायची असेल तर एका भांड्यात गरम पाणी घ्या आणि त्यात तुमची नेलपॉलिश बुडवून ठेवा. 20 मिनिटे ती बॉटल पाण्यातच राहू द्या आणि नंतर काढा.
-थिनरचा वापर
सुकलेल्या नेलपॉलिशसाठी तुम्ही थिनरचा वापर करू शकता. थिनरचे काही थेंब सुकलेल्या नेलपॉलिशमध्ये टाका.
या व्यतिरिक्त जास्त मेहनत न करता नेलपॉलिश आधीसारखी वापरायची असेल तर ती उन्हात ठेवा. 15-20 मिनिटांनी ती उन्हातून काढा आणि बॉटल व्यवस्थितीत हलवा.
-ट्रांसपेरेंट नेलपॉलिशचा करा वापर
जर तुमची नेलपॉलिश सुकत असेल तर ट्रांसपेरेंट नेलपॉलिश तुमच्या कामी येईल. यासाठी तुम्ही सुकलेली नेलपॉलिश नखांना लावा आणि त्यावर ट्रांसपेरेंट नेलपॉलिश लावा.
नेलपॉलिश सुकण्यापासून दूर ठेवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
-सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेल पॉलिश तुम्ही कुठे स्टोर करत आहात. काही महिला त्या फ्रिजमध्ये ठेवातात. पण असे करणे चुकीचे आहे.
-जेव्हा तुम्ही नेलपॉलिश लावाल तेव्हा पंखा बंद असावा. कारण आपण जेव्हा नेलपॉलिशचा ब्रश वापरतो तेव्हा बॉटल ओपन असते. हवेच्या संपर्कात आल्यानंतर ती सुकते.
-बहुतांश महिला आपल्या कॉस्मेटिकची एक्सपायरी डेट तपासून पाहत नाहीत. त्यामुळे त्याची सुद्धा एक्सपायरी डेट पहा. दोन वर्षानंतर नेलपॉलिश वापरू नये.
हेही वाचा- जुन्या कॉटनच्या कपड्यांचा असा करा उपयोग