Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthप्रेग्नेंसीमध्ये डक वॉक करण्याचे 'हे' आहेत फायदे

प्रेग्नेंसीमध्ये डक वॉक करण्याचे ‘हे’ आहेत फायदे

Subscribe

प्रेग्नेंसीमधील प्रत्येक महिलेचा प्रवास हा फार सुंदर असतो. मात्र आव्हानात्मक ही तितकाच असतो. या दरम्यान आईला हेल्दी आणि फिट राहणे अत्यंत गरजेचे असते. आरोग्याप्रति थोडासा जरी निष्काळजीपणा केला तर समस्या उद्भवू शकते. हेल्थ एक्सपर्ट्सनुसार खाण्यापिण्यासह प्रेग्नेंट महिलांनी रुटीनमध्ये हलकी एक्सरसाइज ही करावी. अशातच प्रेग्नेंसीमध्ये डक वॉक करण्याचे काय आहेत फायदे हे जाणून घेऊयात.

खरंतर डक वॉक ही खास प्रकारची स्क्वाटिंग एक्सरसाइज आहे. नावावरुनच कळते की, बदकासारखे चालणे. स्क्वॉट्स पोजीशनमध्ये बसून चालण्याच्या या स्थितीला डक वॉक असे म्हटले जाते. ही एक्सरसाइज करताना भले तुम्हाला विचित्र वाटेल पण याचा फायदा नक्की होतो.

- Advertisement -

Duck Walk During Pregnancy - Is it Safe to Do? - Being The Parent

डक वॉक करण्याचे फायदे
– डक वॉक केल्याने शरीरातील खालचा हिस्सा मजबूत होतो
-पेल्विक फ्लोरचे स्नायू मजबूत होतात
-पेल्विक फ्लोरमध्ये मजबूत डिलिव्हरीसाठी महत्त्वपूर्ण असते
-डक वॉक केल्याने पेल्विक फ्लोरचे स्नायू अॅक्टिव्ह होण्यास मदत होते
-प्रेग्नेंसीमध्ये कंबर आणि पाठ दुखीपासून आराम मिळतो
-पाठीच्या कण्यावर पडणारा दबाव कमी होतो
-डक वॉक केल्याने लेबर पेन पासून आराम मिळतो
-नॉर्मल डिलिव्हरीसाठी मदत होते

- Advertisement -

हेही वाचा-ब्रेस्ट फिडींग करणाऱ्या मॉमचा असा हवा डाएट

- Advertisment -

Manini