पालेभाज्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. भाज्यांमध्ये असणारी पोषक द्रवे मिळण्यासाठी त्याचा रस बनवून पिला जातो. त्याचप्रमाणे दुधी ही एक अशी भाजी आहे की, तिचा रस प्यायल्यास अनेक आरोग्यदायी फायदे होतात. दुधीमध्ये व्हिटॅमिन बी, सी, के, ई, ए, मॅग्नेशियम असे सर्व पोषक द्रवे त्यामध्ये असतात. याशिवाय यामध्ये खूप प्रमाणात फायबर असते. दुधीच्या रसामध्ये कॅलरी आणि लिपिड्स कमी असल्याने ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. दुधीचा रस प्यायल्याने पोट जास्त काळ भरलेले राहून भूक कमी लागते. रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायल्याने पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते.
दुधीचा रस पिण्याचे फायदे
- रिकाम्या पोटी दुधीचा रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. दुधीमध्ये फायबरचे प्रमाण उच्च असते. त्यामुळे रक्तदाब सामान्य राहण्यास मदत होते आणि ह्रदय निरोगी राहण्यास मदत होते.
- सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही वर्कआऊट करत असाल तर नक्की तुम्ही दुधीचा रस प्यायला हवा. त्यातील नॅच्युरल साखर ही ग्लायकोजीन नाही तर कार्बोहायड्रेटची कमतरता भरून काढण्यात मदत होते.
- वजन कमी करायचा असेल तर दुधीचा रस प्यावा. कारण त्यामध्ये कॅलरीज आणि फॅट्स नसते आणि दुधीच्या रसामुळे भूक कंट्रोलमध्ये ठेवण्यास मदत होते.
- दुधीचा रस झोपेच्या संबंधित समस्येवर उपचार करण्यासाठी फायदेशीर आहे. चांगली झोप लागण्यासाठीही तुम्ही दुधीचा रस पिऊ शकता.
- लघवीच्या ठिकाणी जळजळ होत असल्याने दुधीचा रस हा उत्तम उपाय आहे. लघवीमध्ये अॅसिडचे अधिक प्रमाण आढल्यास जळजळ होण्याचा त्रास जाणवत असतो. म्हणून दुधीचा रस हा उत्तम उपाय आहे.
हेही वाचा :