लॉकडाऊन दरम्यान घरच्या घरी करा पाणीपुरी

During lockdown home made pani puri
लॉकडाऊन दरम्यान घरच्या घरी करा पाणीपुरी

पाणीपुरीच नाव जरी घेतल तरी लगेच तोंडाला पाणी येत. लॉकडाऊनमुळे सध्या अत्यावश्यक गोष्टीसोडून सगळे काही बंद आहे. मात्र याच दरम्यान अनेकांना पाणीपुरी खाण्याची इच्छा होत असेल. त्यामुळे आज आपण घरगुती पाणी कशी तयार करतात हे पाहणार आहोत.

साहित्य

पुरीचे साहित्य

मैदा एक वाटी, रवा एक वाटी, सोडा बाय कार्ब एक चमचा, तांदूळाचे पीठ तीन चमचे, मीठ चवीनुसार आणि तेल

तिखट चटणीचे साहित्य

हिरव्या मिरचीची पेस्ट तीन चमचे, पाणीपुरी मसाला दोन चमचे, चाट मसाला दोन चमचे, पुदिन्याची पाने दहा आणि चवीनुसार मीठ

गोड चटणीचे साहित्य

बिया काढलेले खजूर दीड वाटी, भिजवून घेतलेली चिंच एक मोठा चमचा, बारीक केलेला गूळ दोन चमचे आणि मीठ चवीनुसार

रगड्याचे साहित्य

भिजलेला पांढरा वाटणा दीड वाटी, बारीक चिरलेली कोंथिबीर, मोड आलेले मूग दीड वाटी, खाण्याचा सोडा दीड चमचा आणि मीठ चवीनुसार

कृती

पुरी – पुरीचे साहित्य एकत्र मिसळून घट्ट गोळा भिजवावा. १० ते १२ मिनिटे झाकून ठेवावा. झाकून ठेवल्यामुळे रवा नीट भिजून मऊ होतो. मग त्यानंतर हा घट्ट गोळा पुन्हा मळून घेऊन मऊ करावा. त्याचे गोळे करून पातळ पोळ्या लाटाव्या. छोट्या वाटीच्या साहाय्याने त्या पुऱ्या कापाव्यात. गरम तेलात तळून घ्यावा.

रगड्या – रगड्यासाठी पांढरा वाटाणा सोडा घालून मऊ शिजवून घ्यावा. त्यात इतर साहित्य घालून कालवून घ्यावे

गोड चटणीची – भिजलेल्या चिंचेच्या पाण्यातून कोळा काढावा. त्यात इतर साहित्य घालून मिक्सर मधून मऊ वाटून घ्यावे.

तिखट चटणी – पुदिन्याची पाने बारीक चिरून त्यात सर्व साहित्य घालून तिखट चटणी कालवावी. त्यात तीन वाट्या पाणी घालून एकजीव ढवळून घ्यावे. अशाप्रकारे तुम्ही लॉकडाऊन दरम्यान घरगुती पाणीपुरी तयार करू शकता.