व्हॅलेंटाइन वीकमध्ये प्रत्येक डे ला विशेष महत्व असते तसेच रोझ डे ला देखील समान महत्व दिले जाते. व्हॅलेंटाइन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारी रोझ डे पासून होते. या दिवसात तुम्हाला प्रेम व्यक्त करण्याची सुवर्ण संधी मिळते. गुलाब हे प्रेमाचे आणि सौंदर्याचे मैत्रीचे देखील प्रतीक आहे. तुम्हाला प्रत्येक रंगाच्या गुलाबाचे महत्व माहिती आहे का ? आज आपण जाणून घेऊयात गुलाबाच्या प्रत्येक रंगाचे विशेष महत्व.
लाल गुलाब
लाल गुलाबाला प्रेमाचे प्रतीक मानलं जाते. त्यामुळे प्रेम व्यक्त करताना बरेच लोक लाल गुलाब देऊन प्रेम व्यक्त करतात. बहुतेकदा व्हॅलेंटाईन डे किंवा इतर रोमँटिक प्रसंगी लाल गुलाब दिले जाते.
सफेद गुलाब
सफेद गुलाब हे शुद्धता, निरागसता आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक मानले जाते. पांढऱ्या गुलाबाचा वापर विवाहसोहळा आणि धार्मिक समारंभात केला जातो. हे एखाद्याला आशीर्वाद देण्यासाठी किंवा त्यांना चांगल्या नवीन सुरुवातीच्या शुभेच्छा देण्यासाठी देखील दिले जाऊ शकते.
पिवळं गुलाब
पिवळे गुलाब हे आनंद, मैत्री आणि उत्साहाचे प्रतीक मानले जाते. मित्राला पिवळा गुलाब देऊन तुम्ही त्यांना आनंद आणि यशाची शुभेच्छा देऊ शकता.
गुलाबी गुलाब
गुलाबी गुलाब हे मैत्रीचे कोमलता, कौतुक आणि कृतज्ञतेचे प्रतीक आहे. हे गुलाब निरागसता आणि गोडवा दर्शवतात. हे गुलाब तुम्ही तुमच्या मित्रपरिवाराला किंवा कुटुंबातील काही सदस्यांना निश्चितपणे देऊ शकता.
नारंगी गुलाब
नारंगी गुलाब हे उत्साहाचे आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. एखाद्याला प्रेरणा देण्यासाठी किंवा त्यांच्या कामगिरीचा सन्मान करण्यासाठी हे नारंगी गुलाब दिले जाते. नारंगी गुलाबांचा वापर रोमँटिक किंवा प्लेटोनिक दोन्ही नात्यांमध्ये केला जाऊ शकतो.
काळ गुलाब
काळे गुलाब हे दुःख, निरोप आणि शेवट यांचे प्रतीक मानले आहेत. साहित्य आणि कलेत काळ्या गुलाबांचा वापर अनेकदा प्रतीकात्मकपणे केला जातो.
अशाप्रकारे वेगवेगळ्या रंगांचे गुलाब वेगवेगळ्या भावना दर्शवतात . या व्हॅलेंटाइन वीकमध्ये तुम्ही हे वरील गुलाब तुमच्या आवडत्या व्यक्तीला देऊन तुमच्या भावना व्यक्त करू शकता. हा व्हॅलेंटाइन वीक अजून खास बनवू शकता.
हेहा वाचा : Valentine Week : व्हॅलेंटाइन वीकला हे ड्रेस करा ट्राय
Edited By : Prachi Manjrekar