Thursday, September 21, 2023
Eco friendly bappa Competition
घर मानिनी Health सतत इअरफोन वापरल्याने होतील 'या' समस्या

सतत इअरफोन वापरल्याने होतील ‘या’ समस्या

Subscribe

बदलत्या तंत्रज्ञानामुळे आपले आयुष्य अधिक सोपे झाले आहे. अशातच प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग झालेल्या मोबाईल फोनशिवाय दोन मिनिटे सुद्धा राहू शकत नाही. मात्र जर याचा अधिक वापर केल्यास तर यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी अत्यंत नुकसानदायक ठरू शकते. परंतु मोबाईलसह इअरफोनचा अधिक वापर केल्याने सुद्धा आरोग्यासंबंधित काही समस्या उद्भवू शकतात. (Ear phone use may cause health issues)

इअर इंन्फेक्शनचा धोका वाढतो
बहुतांशजणांना सवय असते की, इअरफोनचा वापर केल्यानंतर आपण कुठेही ठेवतो. त्यामुळे वातावरणात असलेली धूळ-माती त्याच्या इअरबडला चिकटली जाते. अशातच ते पुन्हा आपण वापरतो. यामुळे इअर इंन्फेक्शनचा धोका वाढू शकतो.

- Advertisement -

जोरात आवाजात ऐकणे पडू शकते महागात
जर तुम्ही इअरफोनचा वापर गाणी ऐकणे किंवा एखाद्या कामासाठी करत असाल आणि त्याचसोबत त्याचा आवाज उच्च असेल तर तुम्हाला बहिरेपणाची समस्या उद्भवू शकते.

एकाग्रतेची कमी
काही लोक अशी असतात जे काम करताना इअरफोन लावतात. अशातच व्यक्तीमध्ये एकाग्रतेची कमतरता निर्माण होऊ शकते. त्याचसोबत कोणतेही काम व्यवस्थितीत करण्यास अडथळा येऊ शकतो.

- Advertisement -

इअरफोन शेअरिंमुळे संक्रमण वाढते
असे काही वेळेस होते की, आपण एखाद्या दुसऱ्याचा इअरफोन वापरतो. यामुळे तुमच्या कानात दुसऱ्यांचे बॅक्टेरिया जाऊन संक्रमणासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचोबत कान दुखणे, ऐकू न येणे यांचा सुद्धा सामना करावा लागू शकतो.


हेही वाचा- स्मरणशक्ती बूस्ट करण्यासाठी ‘या’ टीप्स येतील कामी

- Advertisment -

Manini