नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. अनेकजण नवीन वर्षात फॅमिलीसोबत, फ्रेन्ड्ससोबत फिरण्याचा प्लॅन करतात. फॅमिली पिकनिक असेल तर कार घेऊन जाण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. कारण कारमध्ये लॉंग ड्राइव्ह करण्याची मज्जाच काही वेगळी असते. फिरायला गेल्यावर कारचा स्पीड हा बऱ्याचदा आनंदाच्या भरात वाढविण्यात येतो. पण, अशावेळी आपण दिवसेंदिवस वाढणाऱ्या अपघातांची संख्या लक्षात घेत काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे जाणून घेऊयात, अशा ड्रायव्हिंग टिप्स, जे फॉलो करणे गरजेचे आहे.
- थंडी सुरू असल्याने हिल्स स्टेशन जसे की, माथेरान, महाबळेश्वरचा प्लॅन केला जातो. अशावेळी गाडी चालवताना वाहनाचा वेग कमी ठेवणे आवश्यक आहे. हिल्स स्टेशनवरील रस्ते वळणा-वळणाचे असतात. त्यामुळे वाहनाचा वेग ताशी ३० किलोमीटर ठेवावा.
- कोणालाही ओव्हरटेक करण्याची चूक करू नये. ओव्हरटेकच्या नादात गाडीवरील नियंत्रण सुटून अपघात होऊ शकतो. त्यामुळे अशी चूक करू नये. गाडी सुरक्षित चालवून पिकनिकचा आनंद घ्यावा.
- हिल्स स्टेशनला जाताना हवामानाचा अंदाज घेऊन जावे. वातावरणातील बदलामुळे तुम्हाला गाडी चालवणे कठीण होऊ शकते.
- हिल्स स्टेशनला फिरायला जायचे म्हणजे धुके असणारच आहे. धुक्यामुळे समोरचे स्पष्टपणे दिसत नाही. अशावेळी धुक्याच्या वातावरणात गाडी चालवण्याऐवजी सुरक्षित ठिकाणी गाडी थांबवून वाट पाहावी.
- गाडी चालवताना वारंवार वेग बदलू नये. विशेष करून हायवेवर गाडी चालवताना ही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे.
- हायवेवर गाडी चालवताना लेन बदलू नये. हायवेवर लेन बदलल्याने अपघातांचा धोका वाढतो. त्यामुळे हायवेवर गाडी चालवताना लेन बदलण्याची चूक करू नये.
- गाडी चालवताना रस्त्यावरील इतर वाहनांपासून अंतर राखले पाहिजे, जेणेकरून अचानक ब्रेक लावण्याची गरज पडली तर दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर राहील.
- गाडी चालवताना सर्वात महत्त्वाचे असते ते म्हणजे योग्य इंडीकेटरचा वापर करणे. इंडीकेटरमुळे आजूबाजूच्या वाहनांना योग्य सिग्नल मिळतो.
- तुम्ही जर लॉंग डाइव्हला जात असाल तर अधूनमधुन ब्रेक घेणे आवश्यक आहे. सतत गाडी चालवल्याने शरीर थकते, त्यामुळे मध्ये ब्रेक घ्यावा.
- Advertisement -
- Advertisement -
हेही पाहा –
Edited By – Chaitali Shinde