Thursday, June 8, 2023
घर मानिनी Kitchen Dum aloo recipe : घरच्या घरी बनवा झटपट दम आलू 

Dum aloo recipe : घरच्या घरी बनवा झटपट दम आलू 

Subscribe

अगदी सोप्या पद्धतीने मस्त झणझणीत दमालूची भाजी घरी नक्की ट्राय करा.

रोज कोणती भाजी बनवायची असा प्रश्न रोज गृहिणींना पडत असतो. त्यासोबतच झणझणीत काही तरी खावं वाटतं असत.अशातच दम आलू ची भाजी मस्त रसदार करून बघा. दम आलू म्हणजेच छोटे बटाटे आणि हि भाजी कंद मुळ्याचा एक भाग आहे. तसेच हि भाजी खाल्याने शरीराला अनेक पोषक घटक देखील मिळतात. ती नक्की ट्राय करुन बघा..

Simple & Healthy Eats: Dum Aloo | Nutrition,Special Days to Celebrate,Party Planning | Blog Post by PALLAVI ACHARYA | Momspresso

- Advertisement -

साहित्य:

 • आठ ते दहा मध्यम उकडलेले दम आलू
 • दोन मध्यम टोमॅटो
 • दोन कांदे
 • आले लसूण पेस्ट
 • खडा मसाला: – हिरवी वेलची, दालचिनीची काडी, लवंग, ब्लॅक पेपर, हिंग,जिरे,मोहरी
 • दोन चमचे गरम मसाला पावडर
 • मीठ/हळद / एक चमचा लाल तिखट- चवीनुसार
 • तिन चमचे तेल-प्रमाणानुसार

 

- Advertisement -

दम आलू रेसिपी इन हिंदी Kashmiri Dum Aloo Recipe in Hindi

 

कृती:

 • सर्वप्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरलेले टोमॅटो,कांदे वाटून घ्या.
 • फोर्कच्या मदतीने आलूना छिद्रे करून घ्यावेत. आणि नंतर आलू उकडायला टाकावे आलू शिजले की त्याचे साल काढून घ्यावे.
 • नंतर कांदा अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट आणि चवीनुसार मीठ मिक्स करा.
 • यानंतर सर्व मसाल्यांमध्ये बटाटे योग्य पद्धतीने मिक्स करून घ्यावे.
 • आता पॅनमध्ये आणखी थोडं आणखी तेल ओता.
 • तेलात चिमूटभर हिंग, एक चमचा जिरे, मोहरी ,दोन ते तीन काळी मिरी, एक लवंग आणि दालचिनीचा एक तुकडा फ्राय करा.
 • मिश्रण एक ते दोन मिनिटे शिजू द्यावे यानंतर मिश्रणात टोमॅटोची पेस्ट मिक्स करा.
 • चार ते पाच मिनिटांनंतर मिश्रणात अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, दोन चमचे धणे पूड आणि कसूरी मेथीची पावडर मिक्स करा.
 • चवीनुसार मीठ घालून सामग्री नीट शिजवून घ्या. यानंतर बटाट्यांच्या मिश्रणाचाही त्यात समावेश करा.
 • आता दोन चमचे गरम मसाला घालून रस्सा घट्ट होईपर्यंत भाजी शिजू द्यावी.
 • स्वादिष्ट भाजी तयार आहे.

हेही वाचा :

Amla Chutney : घरी बनवा झटपट आरोग्यदायी आवळ्याची चटणी

- Advertisment -

Manini