Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीMonsoon Snacks : पावसाळ्यात ट्राय करा या हेल्दी टिक्की

Monsoon Snacks : पावसाळ्यात ट्राय करा या हेल्दी टिक्की

Subscribe

पावसाळा म्हटले की प्रत्येकाला गरमा गरम पदार्थ खाण्याची इच्छा होतेच. अनेकजण जिभेचे चोचले पुरविण्यासाठी आरोग्याचा विचार न करता उघड्यावरील चटपटीत पदार्थ खातात. पण, आरोग्याच्या दृष्टीने असे पदार्थ खाणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळायला हवे. त्याऐवजी तुम्ही घरातच कुरकूरीत टिक्की ट्राय करायला हव्यात. टिक्की संध्याकाळच्या नाष्टासाठी एक उत्तम पर्याय आहे. पाहुयात टिक्कीचे काही प्रकार जे तुम्ही घरी बनवू शकता.

मशरूम डाळ टिक्की –

मशरूम डाळ टिक्की पावसाळ्यात तुम्ही बनवू शकता. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असल्याने शरीरासाठी मशरूम डाळ टिक्की खाणे फायद्याचे ठरते. मशरूम डाळ टिक्कीचा आस्वाद तुम्ही हिरव्या चटणी किंवा सॉस सोबत घेऊ शकता.

पालक टिक्की –

पालकाची पाने, भाजलेले बेसन आणि काही मसाले यांपासून पालक टिक्की बनवली जाते. संध्याकाळच्या नाष्टासाठी पालक टिक्की हा परफेक्ट स्नॅक्स आहे.

पनीर टिक्की –

पनीरला स्मॅश करून कोथिंबीर, जिर, धने पावडर, लाल तिखट, हळद, मीठ टाकून पनीर टिक्की बनवली जाते. कित्येक घरी तर बाहेरून विकत आणून पनीर टिक्कीचा आस्वाद घेतला जातो. पण, पावसाळ्यात पनीर टिक्की घरी बनवू शकता.

मिक्स भाजीची टिक्की –

मिक्स भाजीच्या टिक्कीसाठी गाजर, बटाटा, बीन्स, कोबी, बटाटा आदी भाज्यांचा वापर करण्यात येतो. त्यामुळे मिक्स भाजीची टिक्की विटामिन्स आणि प्रोटीन्सने परिपुर्ण असते. पावसाळ्यात चटपटीत खाण्याची इच्छा झाल्यास मिक्स भाजीची टिक्की नक्की ट्राय करा.

मिक्स डाळ टिक्की –

डाळीमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे मिक्स डाळ टिक्की तुम्ही पावसाळ्यात खायला हवी. संध्याकाळच्या नाष्टासाठी मिक्स डाळची टिक्की हा परफेक्ट पर्याय आहे.

 

 

हेही पाहा :


Edited By – Chaitali Shinde

Manini