घरलाईफस्टाईलट्रिपनंतर बॅग 'अनपॅक' करायच्या सोप्या टिप्स

ट्रिपनंतर बॅग ‘अनपॅक’ करायच्या सोप्या टिप्स

Subscribe

ट्रिप म्हंटले की प्रत्येकाचा उत्साह ओसंडून वाहतो. ट्रिपला जाताना छोट्या मोठ्या गोष्टींची काळजी घेण्यात येते. पॅकिंग करतानाही आपण आपल्या सर्व आवश्यक वस्तू बॅगेत ठेवतो. पण जेव्हा ट्रिप वरून पररतो तेव्हा प्रवास करून थकून आलेलो असतो. त्यामुळे बॅग अनपॅक करायचा कंटाळा येतो. वरवर जरी पिशव्या अनपॅक केल्या तरीही संपूर्ण घर विखुरले जाते आणि पुन्हा सगळ्या गोष्टी जागेवर ठेवण्यास वेळ लागतो. हे आपण सर्वांच्या बाबतीत कधी ना कधी घडत असेलच. मात्र, ट्रिपवरून परतल्यानंतर तुम्हाला तुमचे अनपॅक करण्याचे काम सोपे करायचे असेल, तर तुम्ही काही टिप्स अवलंबल्या पाहिजेत.

Seven tips for how to unpack your bags after a holiday – and if it's still too hard, hire a consultant (they can pack for your next trip too) | South China

- Advertisement -
  • पॅकिंग हलके असावे

अनपॅक करताना तुम्हाला जास्त त्रास होऊ नये असे तुम्हाला खरोखरच वाटत असेल, तर त्यासाठी तुम्हाला आगाऊ तयारी करावी लागेल. उदाहरणार्थ, तुमच्या बॅगमधील पॅकिंग कमी करण्याचा प्रयत्न करा, ज्यामुळे तुमचे काम नंतर सोपे होईल. आपल्याला आवश्यक नसलेल्या गोष्टी पॅक न करण्याचा प्रयत्न करा. याव्यतिरिक्त, मेकअप आणि त्वचेची काळजी घेण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रवासासाठी विशेष पॅकिंग पर्याय निवडा.

  • वैयक्तिक पाउच

ट्रिपवरून आल्यानंतर अनपॅक करणे सोपे करण्याचा एक मार्ग म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी स्वतंत्र पाउच बनवणे. वापरलेले कपडे, स्वच्छ कपडे, कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू नेहमी वेगवेगळ्या पाऊचमध्येच ठेवाव्यात. जेणेकरून तुम्हाला अनपॅक करण्यात कोणतीही अडचण येणार नाही.

- Advertisement -
  • नियोजन

घरी परतल्यानंतर बॅग अनपॅक करण्यासाठी कंटाळा येवू नये. यासाठी तुम्हाला थोडी स्मार्ट ट्रिक अवलंबण्याची गरज आहे. यासाठी तुम्हाला फक्त एवढंच करायचं आहे की जेव्हा तुम्ही परतण्याची तयारी कराल तेव्हा तुमची बॅग आणि सामान व्यवस्थित ठेवा. जसे की, कपडे, रोजच्या वापरातील वस्तू या एकत्र कशाही ठेवू नका. असे केल्यास ट्रीपवरून आल्यास त्या वेगवेगळ्या करण्यात तुमचा अर्धा वेळ जाईल.

  • ताबडतोब अनपॅक करायचा प्रयन्त करा

तुम्ही घरी परतल्यावरच तुमचे सामान अनपॅक करण्याचा प्रयत्न करा. अनपॅक करताना, वस्तू त्याच वेळी त्यांच्या जागी ठेवा. यामुळे अनपॅक करताना फारसा त्रास होत नाही. उदाहरणार्थ, गलिच्छ कपडे ताबडतोब लॉन्ड्रीमध्ये ठेवा. मेकअप अथवा बाथ संबंधित गोष्टी लगेचच त्या त्या जागी ठेवा.

 


हेही वाचा ; झोपण्याआधी टीव्ही, मोबाईल बघता? मग व्हा सावध

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -