शरीर निरोगी ठेवण्यासाठी लहानांपासून ते मोठ्यांपर्यत सर्वांनीच दररोज व्यायाम करणे गरजेचे आहे. लहान मुलांना दररोज व्यायाम करण्याची सवय लावणे मोठे कठीण काम असू शकते. अशावेळी तुम्ही युक्ती वापरुन मुलांना सोपी योगासने करण्याची सवय लावू शकता. योगा शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर असतो. योगाच्या सरावाने मन शांत होते.योगा तुम्ही मुलांसोबत स्वत:ही करू शकता, ज्यामुळे मुलांसह तुमचेही आरोग्य उत्तम राहील. चला तर मग जाणून घेऊयात, लहान मुलांसाठी सोपी योगासने
सुर्यनमस्कार –
शरीर लवचिक होते, पचनक्रिया मजबूत होते यासह स्नायुंना बळकटी मिळण्यास मदत मिळते. त्यामुळे सर्वात सोपा व्यायाम असा सुर्यनमस्कार करण्याची सवय मुलांना लावावी.
मार्जरी आसन –
मार्जरी आसन अर्थात कॅट आसनाच्या सरावाने श्वसनाशी संबंधित तक्रारी कमी होतात. या योगासनाच्या सरावाने मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत मिळते.
सेतुबंधासन –
सेतुबंधासनाच्या सरावाने छाती, मान, पाठ स्ट्रेच करण्यासाठी मदत मिळते. यासोबत पोटाच्या तक्रारी कमी होतात. या आसनामुळे मुलांचे शारीरिक, मानसिक विकास होतो.
बालासन –
मुलांना वारंवार, पोटदुखी, अपचनसारख्या समस्या जाणवत असतील तर बालासन करण्याची सवय लावावी.
वृक्षासन –
अभ्यासाचा ताणतणाव दूर करण्यासाठी हे योगासन फायदेशीर सांगण्यात येते.
ताडासन –
ताडासनाच्या सरावाने मुलांचा एकाग्रता वाढते आणि मुलांची श्वास घेण्याची क्षमता वाढते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुलांचा मूड सुधारण्यासाठी ताडासन लाभदायी मानले जाते.
सर्वांगासन –
सर्वांगासनामुळे डोक्याला रक्तप्रवाह होतो. ज्यामुळे मन शांत होते आणि बुद्धी तल्लख होते.
हे ही लक्षात घ्यावे –
- तज्ञांच्या माहितीनुसार, 5 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाची मुले योगासने करू शकतात.
- योगा करण्यापूर्वी मुलांना श्वासोच्छवासाची प्रॅक्टिस करण्यास सांगावे.
- यासाठी तुम्हाला बेली ब्रींदिंग, फ्लॉवर ब्रीद सारखे व्यायाम करता येतील.
हेही पाहा –