Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीYoga For Stress Relief : स्ट्रेस दूर करण्यासाठी उपयुक्त योगासने

Yoga For Stress Relief : स्ट्रेस दूर करण्यासाठी उपयुक्त योगासने

Subscribe

धावपळीची लाइफस्टाइल, कामाचा ताण, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी यामुळे शारीरिक, मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्यावर स्ट्रेस, चिंता अशा समस्या जाणवतात. अशावेळी स्ट्रेस दूर करण्यासाठी योगासनाचा सराव करणे फायद्याचे ठरेल. योगामुळे स्ट्रेस दूर होईलच शिवाय शारीरिक व्याधी कमी होतील. चला तर मग जाणून घेऊयात, स्ट्रेस दूर करण्यासाठी उपयुक्त योगासने कोणती आहेत,

सूखासन –

स्ट्रेस दूर करण्यासाठी सूखासन करणे फायद्याचे ठरेल. या योगासनाच्या सरावाने मेंदू, मन शांत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे योगासन करण्यास अतिशय सोपे असते.

बालासन

बालासनाच्या सरावाने केवळ मानसिक शांतीच नाही तर शारीरिक व्याधींपासून आराम मिळतो. खरं तर, जेव्हा तुम्ही बालासन करता, तेव्हा मूड सुधारण्यास मदत मिळते. ज्यामुळे तुमची कामे व्यवस्थित होतात.

शशांकासन –

स्ट्रेस कमी करण्यासाठी शशांकासन अत्यंत प्रभावी आसन मानले जाते. तुम्ही दररोज 10 मिनिटे याचा सराव करायला हवा.

मार्जरी आसन –

मार्जरी आसन केल्याने स्ट्रेस दूर करण्यासह शारीरिक दुखणे कमी होते. रोजच्या धावपळीच्या रुटीनमध्ये बऱ्याचजणांना पाठदुखी, पायदुखीचा त्रास जाणवतो. अशावेळी तुम्हाला मार्जरी आसनाचा सराव करणे फायद्याचे ठरेल.

पश्चिमोत्तासन –

कमेरचे दुखणे कमी करण्यासह स्ट्रेस दूर करण्यासाठी पश्चिमोत्तासन योगासनाचा सराव करावा.

उत्तानासन –

उत्तानासनाच्या सरावाने मेंदूतील रक्ताभिसरण वाढल्यामुळे मन शांत आणि स्थिर होते. मन शांत झाल्यामुळे स्ट्रेसपासून आराम मिळतो. यासह डोकेदुखी, निद्रानाशेच्या समस्येवरही हे आसन उपयुक्त मानले जाते.

भुजंगासन –

कंबर, पाठदुखी, ब्लड सर्कुलेशन सुधारण्यासाठी, मानसिक आरोग्यास चालना देण्यासाठी भुजंगासनाचा सराव फायदेशीर मानले जाते. हे आसन करताना 20 ते 30 सेकंद स्वत:ला धरून ठेवावे.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini