घरलाईफस्टाईलSummer Tips : “या” फळांसह भाज्यांचे करा सेवन

Summer Tips : “या” फळांसह भाज्यांचे करा सेवन

Subscribe

उन्हाळ्यात काही फळांचे सेवन केल्यास शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होते.

दरवर्षीप्रमाणे कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. हवामानातील बदलांमुळे विविध प्रकारचे आजारदेखील उद्भवतात. डोक्यावर तळपता सूर्य, शरीरातून टपकणार्यार घामाच्या धारा, अंगाची होणारी लाही लाही आणि घशाला सतत पडणारी कोरड या सगळ्यामुळे जीव अगदी हैराण होतो. अशावेळी थंड पेयाचे सेवन करावेसे वाटते. मात्र, बंद पॅकेटमधील पेय शरीरास घातक ठरतात. मात्र, जर तुम्ही भाज्यांसह काही फळांचे सेवन केल्यास त्याचा चांगला फायदा होतो. तसेच उन्हाळ्यात शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास देखील मदत होते. चला तर नजर टाकूया अशाच काही फळ आणि भाज्यांवर.

काकडी

काकडी ही अशी भाजी आहे. जी १२ ही महिने बाजारात उपलब्ध होते. विशेष म्हणजे काकडीमध्ये ९५ टक्के पाणी असते. त्यामुळे त्याच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास मदत होते. त्याचप्रमाणे विटॅमिन, पोटॅशियम, मॅग्नेशियमचीही भरपूर मात्रा काकडीमध्ये असते. काकडीमध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते. शरीरासाठी काकडी डिटॉक्सिफायरचे काम करते.

- Advertisement -

टोमॅटो

टोमॅटो वर्षाच्या बाराही महिने उपलब्ध असतो. त्यामध्ये ९५ टक्के पाण्याचे प्रमाण असते. टोमॅटोच्या सेवनामुळे फोलेट, पोटॅशियम, फायटोकेमिकल्स यांसारखी पोष्क तत्वे मिळतात.

संत्र

संत्र हे आरोग्यासाठी एक उत्तम फळ मानले जाते. संत्र्यामध्ये ८८ टक्के पाणी असते. विटॅमिन ए, सी, कॅल्शियम आणि फायबर अशी तत्त्वे या फळांमध्ये असतात. उन्हाळ्यामध्ये या फळाच्या सेवनामुळे शरीरातील पाणी पातळी समतोल राखता येतो. या फळाच्या सेवनामुळे शरीरातील पोटॅशियमची कमतरता दूर होते.

- Advertisement -

आंबा

आंबा हा केवळ उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये आढळतो. त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात बाजारात दाखल होणाऱ्या आंब्याचे सेवन आरोग्यासाठी उत्तम ठरते. आंबा हा अनेक पोषक तत्त्वांनी परिपूर्ण असे फळ मानले जाते.

टरबूज

टरबूज या फळामध्ये ९२ टक्के पाणी असते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी राखण्यास टरबूज फायदेशीर ठरते. यामध्ये विटॅमिन, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियमसारखी पोषक तत्वेही असतात.


हेही वाचा – रात्री उशिरा जंकफूड खाल्ल्याने दुसऱ्या दिवशी कामावर होतो परिणाम?


 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -