घरलाईफस्टाईलभुईमुगाच्या शेंगा उकडून खा आणि फरक बघा!

भुईमुगाच्या शेंगा उकडून खा आणि फरक बघा!

Subscribe

आपल्याकडे सर्रास जेवणाच्या ताटासोबत भुईमुगाच्या शेंगा खाण्याची पद्धत आहे. कोणत्याही वयोगटातील लोकं या शेंगा आवडीने खातात. भुईमुगाच्या शेंगा भाजून, मीठ आणि हळद टाकून उकडून तर कधी कच्च्याच खाल्ल्या जातात. पण, तुम्हाला माहिती आहे का, प्रामुख्याने हिवाळ्यातच मोठ्या प्रमाणात या शेंगा का खाल्ल्या जातात आणि हे खाण्याचे नेमके फायदे कोणते? तर माहिती तुमच्यासाठी आहे. भुईमुगाच्या शेंगा खाणे फारच पौष्टिक आणि हेल्दी मानले जाते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी तर आवर्जुन भुईमुगाच्या उकडलेल्या शेंगा खायला हव्यात. भाजून किंवा तळून भुईमुगाच्या शेंगा खाण्याऐवजी त्या उकडून खाल्ल्या तर त्यात असलेल्या पोषक तत्त्वांचा फायदा चार पटीने जास्त होतो. त्यासोबतच या शेंगा उकडल्यावर त्यातील अँटी-ऑक्सिडेंटचे प्रमाणही वाढते.

शेंगदाणे हे प्रोटीनचे मोठा स्रोत आहेत. १०० ग्राम शेंगदाण्यात १ लिटर दुधाइतके प्रोटीन असतात. शेंगदाण्यात अमिनो आम्ल असतात जे वाढीसाठी आणि विकासासाठी उपयोगी ठरतात. शेंगदाण्याच्या सेवनाने पोटाचे आजार टळतात. शेंगदाण्यात पॉली फेनॉलिक अँटी ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, तसेच शेंगादाण्यातील काही ठरावीक घटकांमुळे पोटाच्या कॅन्सरला प्रतिबंध होतो. शेंगादाण्यामध्ये जीवनसत्व व्हिटॅमिन बी आढळते जे शरीराला आवश्यक असते. त्यामुळे मेंदूचे आरोग्य व्यवस्थित राहते आणि मेंदूला जाणारा रक्तप्रवाह योग्य राहतो, तसेच शेंगादाण्यामध्ये व्हिटॅमिन – ई आढळते. व्हिटॅमिन – ई शरीरातील पेशींचे आवरण आणि त्वचा यांचे संरक्षण करते.

- Advertisement -

भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्याने शरीराला त्वरित ऊर्जा मिळते. यात फॅट कमी असतात. त्यामुळे या शेंगा खाल्ल्याने वजन वाढण्याची भीती राहत नाही, तसेच यात कॅलरीही कमी असतात. अशात जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगांचा आहारात आवर्जुन समावेश करा. उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगांमध्ये भाजलेल्या किंवा तेलात तळलेल्या शेंगांपेक्षा अधिक फायबर असते. जास्त फायबर असलेला आहार घेतल्याने खाल्लेले अन्न चांगल्याप्रकारे पचन होण्यास मदत होते. त्यासोबतच मेटाबॉलिज्म मजबूत होते. ज्यामुळे शरीरात जमा झालेली एक्स्ट्रा चरबी वेगाने बर्न होते. भुईमुगाच्या शेंगांमध्ये व्हिटॅमिन बी ६ आणि व्हिटॅमिन ए असतात. त्यामुळे जर हिवाळ्यात सकाळी उकडलेल्या भुईमुगाच्या शेंगांमध्ये किशमिश खाल्ल्यास त्याने डोळ्यांची दृष्टी वाढते. भुईमुगाच्या शेंगांमध्ये पॉलीफेनॉलिक अँटी-ऑक्सिडेंट आणि रेल्वेराट्रॉल असतात. अशात भुईमुगाच्या शेंगा खाल्ल्याने हृदयरोग, कॅन्सर असे आजार आणि वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून बचाव होतो. त्यासोबतच या तत्वांमुळे शरीरात नायट्रिक ऑक्साइड जास्त तयार होऊ लागतो. त्यामुळे या शेंगा खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -