घरलाईफस्टाईलकोरोना काळात सोया फूड्स खाऊन वाढवा Immunity, FSSAI चा सल्ला

कोरोना काळात सोया फूड्स खाऊन वाढवा Immunity, FSSAI चा सल्ला

Subscribe

देशात कोरोनाचा कहर सुरू असून दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा वाढत आहे. अशातच कोरोनाशी दोन हात करण्यासाठी रुग्णांमध्ये उत्तम रोग प्रतिकारशक्ती असणं आवश्यक असते. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान या विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी आपल्याला आपली प्रतिकारशक्ती बळकट ठेवण्याची गरज आहे. शरीरात प्रथिनं आणि फायबर वाढविण्याकरिता आपल्याला योग्य प्रमाणात फायबर आणि प्रथिनंयुक्त अन्न पदार्थांचे सेवन करणं आवश्यक आहे.  सोयाबीनचे पदार्थ अर्थात सोया फूड हे प्रतिकारशक्तीचे उत्तम स्त्रोत मानली जातात. सोयाबीनचे अन्नपदार्थ शरीरातील फायबर आणि प्रथिनांची कमतरता अगदी सहज पूर्ण करतात. यासह हे पदार्थ आपले हृदय निरोगी ठेवण्याचे देखील कार्य करतात. याशिवाय सोयामध्ये असलेल्या प्रथिनेमुळे आपली प्रतिकारशक्तीही वाढते. कोरोनाच्या या काळात कमी होणारी रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्रथिनयुक्त पदार्थ खाणे फार महत्वाचे आहे.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) यांनी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये सोया पदार्थांचे फायदे सांगण्यात आले आहेत. FSSAIच्या मते, सोयाफूड्स सोयाबीनपासून बनविली जातात. हे पदार्थ प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. शाकाहारी लोकांसाठी शरीरातील प्रथिने आणि फायबरचा वाढवण्यासाठी सोयाबीन आणि त्याची उत्पादने उत्तम पर्याय आहे.

- Advertisement -

तुम्ही तुमच्या जेवणात अनेक प्रकारे सोयाबीनचा वापर करू शकतात. सोया नग्लेट्स, टोफू, सोया ग्रॅन्यूल, सोया दूध, सोया पीठ आणि सोया नट्स देखील वापरू शकतात. सोयाबीन हा शरीरातील प्रथिने आणि फायबरच्या कमतरतेवर मात करण्याचा उत्तम मार्ग आहे. त्यामुळे तुम्ही नाश्ता किंवा जेवणामध्ये सोयाबीनचा वापर करू शकतात.

असे आहेत सोयाबीनचे फायदे

  • सोयाबीनमध्ये भरपूर प्रथिने आणि फायबर असतात.
  • सोयाबीनमध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड देखील भरपूर प्रमाणात असते.
  • सोयाबीनहे पूर्णपणे लैक्टस आणि ग्लूट फ्री असतात.
  • सोयाबीनमध्ये सॅच्युरेटेड फॅटही खूप कमी प्रमाणात असतात.
Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -