Sunday, December 3, 2023
घरमानिनीHealthहिवाळ्यात उपशीपोटी खा 'हे' पदार्थ शरीराला होतील फायदे

हिवाळ्यात उपशीपोटी खा ‘हे’ पदार्थ शरीराला होतील फायदे

Subscribe

थंडीच्या दिवसात रिकाम्या पोटी काही पदार्थ खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो. हे पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी खाल्ल्याने दिवसभर शरीराला उर्जा मिळते. शरीराला गरम आणि स्वस्थ ठेवण्यासाठी यामुळे मदत होते. त्याचबरोबर वजनही कंट्रोलमध्ये राहते.

थंडीत उपाशीपोटी खा ‘हे’ पदार्थ

  • कोमट पाणी आणि मध

- Advertisement -

थंडीच्या दिवसात सकाळी उपाशीपोटी कोमट पाण्यात मध घालून प्या. मधामध्ये मिनरल्स, व्हिटामिन्स, फ्लोवोनोइड्स जास्त प्रमाणात असते. कोमट पाण्यात मध घालून प्यायल्यास शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडण्यास मदत होते. त्याचबरोबर वजन कमी होण्यासही मदत होते.

  • सुका मेवा

360,300+ Dry Fruits Stock Photos, Pictures & Royalty-Free Images - iStock | Dry fruits ladoo, Dry fruits chakki, Dry fruits top view

- Advertisement -

 

नाश्ता करण्याआधी सुक्या मेव्याचे सेवन करा. सुका मेवा खाल्ल्याने पोट साफ राहते, पचनक्रिया सुधारते. पोटाचा पीएच लेवल स्थिर राहण्यास मदत होते. त्यामुळे दररोज बदाम, मनुके आणि पिस्ताचे सेवन करा.

  • पपई

Papaja – jak jeść? Jak smakuje ten owoc? - Dziennik szefa | Przepisy.pl

 

उपाशी पोटी पपई खाणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. पपई हे फळ प्रत्येक ऋतूमध्ये मिळते. त्यामुळे सकाळी नाश्ताच्या वेळी पपई खाणे कधीही उत्तम. पपई खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल कमी राहते. त्याचबरोबर अनेक आजार आणि मुख्य म्हणजे वजनही कमी होते.

  • भिजवलेले अक्रोड

7 Reasons Why You Should Eat Soaked Walnuts In The Summer

 

सकाळी उपाशीपोटी भिजवलेले अक्रोड खाणे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. सुखे अक्रोड खाण्यापेक्षा भिजवलेले अक्रोड खाणे कधीही योग्य. भिजवलेल्या अक्रोडमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. रात्री दोन-तीन अक्रोड पाण्यात भिजवून सकाळी त्याचे उपाशीपोटी सेवन करा.

  • बदाम

Nutrition Face-Off: Soaked Almonds Vs. Soaked Walnuts – Which Packs A Healthier Punch?

 

दररोज रात्री बदाम पाण्यात भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर उपाशी पोटी बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराला खूप फायदे होतात. बदामामध्ये मँगनीज, व्हिटामिन इ, प्रोटीन, फायबर, ओमेगा 6 फँटी एसिड मोठ्या प्रमाणात असते. भिजवलेल्या बदामाची साल काढून खावे. बदाम खाल्ल्याने शरीराला पोषक तत्त्वे मिळतात. पोषक तत्त्वाबरोबरच बदाम खाल्ल्याने शरीराला उष्णता मिळते.


हेही वाचा :

थंडीत ‘या’ सवयींपासून दूर रहा

- Advertisment -

Manini