Sunday, April 21, 2024
घरमानिनीHealthभुकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी खा 'हे' पदार्थ

भुकेवर नियंत्रण मिळवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ

Subscribe

अनेकांना कितीही खाल्लं तरी सतत भूक लागते. त्यामुळे ते सतत काही ना काही खात असतात. परंतु या सवयीमुळे जास्त वजन वाढते. अशावेळी भूकही नियंत्रणात ठेवता येत नाही. पण, आता आम्ही तुम्हाला सतत लागणारी ही भूक कंट्रोल करण्यासाठी काही खास पदार्थ सांगणार आहोत. यामुळे तुमची भूक कंट्रोल राहू शकते.

‘हे’ पदार्थ खाऊन ठेवा भुक नियंत्रणात

Should You Be Fasting or Is it a Fad? | Stonesoup

- Advertisement -
  • काकडी

काकडीमध्ये शरीर क्लिंज करण्याचे तसेच वजन कमी करण्याचे आणि शरीर निरोगी राखण्याचे गुणतत्वे असतात. तसेच काकडीचे सेवन केल्याने पोट देखील भरल्यासारखे होते. यामुळे भूक कंट्रोल करण्यासाठी काकडीचे सेवन करावे.

  • अंडी

अंड्यामुळे बराच वेळ पोट भरलेले राहते. तसेच अंडी हा प्रोटीनचा चांगला सोर्स असून त्याने वजन देखील कमी होण्यास मदत होते. एका उकडलेल्या अंड्यामध्ये 100 हून कमी कॅलरी असतात. यामुळे कॅलरी इनटेक वाढत नाही.

- Advertisement -
  • चिया सीड्स

वजन कमी करण्यासाठी चिया सीड्सचे सेवन करु शकता. चिया सीड्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. ज्यामुळे बराच वेळ भूक देखील लागत नाही..

  • डाळ

डाळीचे सेवन अधिक प्रमाणात करावे, यामुळे त्याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होतो. विशेष म्हणजे डाळीत आर्यन, पोटॅशियम, थायमिन आणि मँगनीजसारखी पोष्कतत्वे असतात. डाळ हा प्रोटीन आणि फायबरचा चांगला सोर्स आहे. यामुळे सातत्याने भूक लागत नाही.


हेही वाचा :

बडीशेप खाणं त्वचेसाठी फायदेशीर

- Advertisment -

Manini