Monday, January 20, 2025
Homeमानिनीपावसाळ्यात करा या ५ फळांचे सेवन, राहाल निरोगी

पावसाळ्यात करा या ५ फळांचे सेवन, राहाल निरोगी

Subscribe

पावसाळ्यात टायफॉईड , मलेरिया यासारखे संसर्गजन्य आजार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे साथीच्या आजारांपासून दूर राहण्यासाठी तुम्ही सर्वात आधी स्वच्छतेकडे लक्ष द्यायला हवे. यानंतर सकस आहारही घ्यायला हवा कारण पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे रोगप्रतिकारशक्ती कमकुवत झालेली असते. अशा परिस्थितीत विविध आजार होऊ शकतात. त्यामुळे तुम्ही शरीराला ऊर्जा देण आवश्यक आहे. शरीराला ऊर्जा देण्यासाठी तुम्ही फळांचे सेवन करू शकता. पावसाळ्यात शरीर निरोगी राहण्यासाठी कोणती फळे खावीत, पाहुयात

लिची –

लिची हे फळ खूप स्वादिष्ट आणि शरिरासाठी फायदेशीर आहे. लिचीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते. पावसाळ्यात पोटाच्या तक्रारी जास्त प्रमाणात जाणवतात. त्यामुळे लिची खाणे फायद्याचे ठरेल.

नासपती –

नासपती पोटाच्या आरोग्यासाठी उत्तम फळ आहे. त्यामुळे पावसाळयात पोटाच्या आरोग्यासाठी तुम्ही नासपतीचे सेवन करायला हवे.

जांभूळ –

पावसाळ्यात येणारी जांभूळ हे आरोग्याच्या विविध तक्रारींवर रामबाण उपाय आहे. जांभळामध्ये व्हिटॅमिन सी, फायबर आणि भरपूर प्रमाणात आयर्न असते. ज्यामुळे या दिवसात प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जांभूळ खाणे फायदेशीर ठरते.

डाळिंब –

आयर्न आणि व्हिटॅमिन्सने परिपूर्ण असलेले डाळिंब शरीरातील रक्त वाढवण्याचे काम करते. त्यामुळे रोज एक तरी डाळिंब खायला हवे.

सफरचंद –

दररोज एक सफरचंद खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. सफरचंदामध्ये पोटॅशियम, ग्लुकोज, फॉस्फरस, आयर्न आदी पोषक तत्वे आढळतात. त्यामुळे पावसाळ्यात तुम्ही एक सफरचंद खायला हवेत.

 

 

 


हेही पाहा :

Manini