जर टिव्हीवरील जाहीरात बघून, व्हॉट्सअपवरील पोस्ट वाचून, मित्रांनी सांगितलं म्हणून तुम्हीही मल्टीव्हिटामीनच्या गोळ्या खात असाल तर वेळीच सावध व्हा. कारण थकवा आल्यावर, चक्कर आली म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मल्टीव्हिटामीनच्या गोळ्या घेणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
जेव्हा आपण सकस आहार घेतो तेव्हा त्या आहारातून आपल्याला सर्वच पोषक घटक मिळत असतात. पण जर तुम्ही जेवणापेक्षा जंकफूड,पाकिट बंद पदार्थांचे अधिक सेवन करत असाल तर मात्र शरीरात व्हिटामीनची कमतरता जाणवते. त्यामुळे दिवसभर थकवा जाणवणे, कामात उत्साह नसणे, गरगरणे, झोप न येणे , डोकेदुखी यासारख्या समस्या सुरू होतात. अशावेळी बरेचजण कोणाच्यातरी सांगण्यावरून तर कधी कुठे आलेल्या वाचनाच्या आधारावर मल्टिव्हिटामीन गोळ्या घेणे सुरू करतात.
पण खरं तर तुमच्या शरिराला मल्टीव्हिटामीनची गरज आहे का हे डॉक्टरच सांगू शकतात. यामुळे स्वत:हून अशा गोळ्या घेणे आरोग्यासाठी धोकादायक होऊ शकते.
त्यामुळे शरीरात अतिरिक्त व्हिटामीन झाल्याने पोटासंबंधी समस्या निर्माण होतात.
एवढेच नाही तर शरीरात मर्यादेपेक्षा जास्त व्हिटामीन्स निर्माण झाल्यास कॅन्सरचा धोका निर्माण होतो.
फुफ्पुसांवरही त्यांच्या दुष्परिणाम होतो.
यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणत्याही गोळ्या औषधांचे सेवन करू नये.
हेही वाचा :