Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर लाईफस्टाईल सावधान! डबाबंद पदार्थ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती होतेय कमी

सावधान! डबाबंद पदार्थ खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती होतेय कमी

Related Story

- Advertisement -

डबाबंद पदार्थ आरोग्यास अपायकारक आहेत हे माहित असूनही त्याचा दैनंदिन जीवनात सर्रास वापर केला जातो. पण याच डबा बंद पदार्थांमुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होत असून कोरोनाच्या या काळात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. एका संशोधनात डबाबंद पदार्थ खाल्ल्याने नागरिकांची रोग प्रतिकारक शक्ती कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच या डबाबंद पदार्थ खाणाऱ्या नागरिकांवर कोरोना लसीचाही कमी प्रभाव होत आहे. ही चिंतेची बाब असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

बदलत्या जीवनशैलीमुळे डबाबंद पदार्थ खाण्याकडे नागरिकांचा कल वाढतोय. जगातील अनेक देशांमध्ये डबाबंद पदार्थ खाल्ले जातात. यामुळे वेळही वाचतो आणि कष्टही करावे लागत नाहीत. पर्यावरणावर काम करणाऱ्या एका आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्थेने संसर्गजन्य आजार आणि डबाबंद

- Advertisement -

पदार्थांवर संशोधन केले. त्यात पदार्थ दीर्घकाळ ताजे राहण्यासाठी त्यांच्यावर जी प्रकिया केली जाते त्यात ठराविक प्रकाराची रसायने वापरली जातात. याच रसायनांचा रोगप्रतिकारक शक्तीवर आणि शरीरातील विविध अवयवांवर विशेषत: किडणीवर दुष्परिणाम होत असल्याचे समोर आले. या पदार्थांची विशिष्ट अशी पॅकिंग केली जाते. परंतु या पॅकिंगमध्ये पदार्थ जास्त वेळ राहिल्यास अनेक रासायनिक घटक त्या पदार्थांमध्ये मिसळतात. अशाप्रकारे हे रासायनिक पदार्थ शरीरात प्रवेश करतात. त्यामुळे कोरोनासारख्या संसर्गाचा सामना करताना नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती कमी पडत आहे.

दरम्यान, यासंबंधी काही प्राण्यांवर संशोधन करण्यात आले होते. या प्राण्यांना डबाबंद रासायनिक पदार्थ असलेले पदार्थ देण्यात आले. त्यानंतर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होत असल्याचे समोर आले. कोरोना हा संसर्गजन्य आजार असून तो थेट रुग्णाच्या श्वसनसंस्थेवरच हल्ला करतो. पण जर रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती अधिक असेल तर कोरोनावर मात करता येते. यामुळे कोरोनाशी लढण्यासाठी योग्य आहार करणे गरजेचे असते. पण अनेकजण डबाबंद पदार्थांना प्राधान्य देताना दिसतात. कोरोना मुळे नागरिक आरोग्याप्रती जागरुक झाले असून डबाबंद पदार्थांचे सेवन केल्यास आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांकडे आता गांभीर्याने बघणे गरजेचे असल्याचे मत तज्त्र व्यक्तींनी व्यक्त केले आहे. यामुळे नागरिकांनी हॉटेल्समध्ये खाण्यापेक्षा घरातील पौष्टिक अन्न आणि हायजेनिक खाण्याला प्राधान्य देत आहेत. तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढणारे फळे, भाज्य, अन्न खाणे पसंत करत आहेत.


- Advertisement -

 

- Advertisement -