Sunday, December 3, 2023
घरमानिनीHealthअति गोडं खाणे त्वचेसाठी ठरु शकते धोकादायक

अति गोडं खाणे त्वचेसाठी ठरु शकते धोकादायक

Subscribe

त्वचेचा पीएच बिघडण्यामागे काही कारण असतात. त्यापैकीच एक म्हणजे तुमचे डाएट. तुम्ही काय खात आहात किंवा काय काय खाऊ नये याची सुद्धा तुम्ही काळजी घेतली तर तुमची त्वचा हेल्दी राहू शकते. स्किनवर केवळ मेकअप लावल्याने त्वचा उत्तम दिसते असे नाही. त्यासाठी काही उपाय केले तर तुमची स्किन चमकदार दिसू शकते. त्याचसोबत अधिक साखर असलेले पदार्थ खाल्ल्याने मधुमेह आणि कोलेस्ट्रोलच नव्हे तर याचा परिणाम तुमच्या त्वचेवर ही होतो. (Eating too much sugar skin problem)

डायटिशन आणि वेट लॉस एक्सपर्ट्स असे म्हणतात की, अधिक प्रमाणात साखरेचे सेवन केल्याने तुमच्या त्वचेचे आरोग्य बिघडले जाते. अधिक साखरेचे सेवन केल्याने काही संभाव्य नुकसान सुद्धा होऊ शकते.

- Advertisement -

हेल्दी त्वचेसाठी अधिक शर्करायुक्त पेय, प्रोसेस्ड फूड आणि मीठाई यांचे सेवन कमी करावे. त्याऐवजी संतुलित आहाराकडे लक्ष द्यावे. त्यामध्ये फळं, भाज्या, लीन प्रोटीनचा समावेश असावा.

- Advertisement -

अधिक साखर असलेले पदार्थ खाल्ल्याने होणारे नुकसान
-अँन्टी एजिंगची समस्या
अधिक साखर असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमच्यामध्ये अँन्टी एजिंगची समस्या उद्भवू शकते.

-त्वचेला सूज येऊ शकते
साखरेचे अधिक सेवन केल्याने सूज येण्याची समस्या उद्भवू शकते. जुन्या कोलेजन आणि इलास्टिन फायबरला नुकसान पोहचवू शकते. त्यामुळे त्वचेचा संरचनात्मक स्पोर्ट तुटतो आणि सुरकुत्या, स्किन सैल होण्याची लक्षणं दिसून येतात.

-पिंपल्स
अधिक गोड पदार्थ खाल्ल्याने इंसुलिनच्या स्तरात वाढ होऊ शकते. यामुळे त्वचेतील सीबम आणि तेल अधिक प्रोड्यूस होऊ शकते. अतिरिक्त तेल, बंद रोमछिद्रांसह पिंपल्स, ब्रेकआउटचे कारण ठरु शकते.

-ग्लाइसेमिक लोड
उच्च ग्लाइसेमिक इंडेक्स असणारे खाद्य पदार्थ जसे की, गोड स्कॅन्स किंवा रिफाइंड कार्बोहाइड्रेट, रक्त शर्कराच्या स्तरात वेगाने वृद्धी होऊ शकते. रक्त शर्करामध्ये हा चढ-उतार सूज आणि ऑक्सिडेटीव तणाव वाढवू शकतात.


हेही वाचा- लंचमध्ये चुकूनही खाऊ नयेत हे पदार्थ

- Advertisment -

Manini