अनेकांना वरण-भात खायला खूप आवडतो. काहीजण दिवसातून कमीत-कमी दोन वेळा तरी वरण-भात खातात. परंतु काहीजण असे आहेत, ज्यांना वरण-भात खायला अजिबात आवडत नाही. वरण-भात आवडत असो वा नसो, असे साधे जेवण आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. दररोज वरण-भात खाण्याचे काय फायदे आहेत हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
दररोज वरण-भात खाण्याचे आहेत कित्येक फायदे
- वजन नियंत्रित ठेवते
वजन कमी करायचे असल्यास वरण-भात खाऊ नका. असं अनेकजण म्हणतात. परंतु हे पूर्ण सत्य नाही. जर तुम्ही वेट लॉस डायट घेत आहात तर आठवड्यातून दोन वेळा वरण-भात खा. वरण-भातामुळे पोट लवकर भरते. जर तुम्हाला वाटले तर तुम्ही व्हाईट राइस ऐवजी ब्राऊन राईससुध्दा खाऊ शकता.
- प्रोटीनचा चांगला स्त्रोत
जे लोक शाकाहारी आहेत. त्यांच्यासाठी डाळ प्रोटीनचा एक खूप चांगला स्रोत आहे. वरण-भातामध्ये वेगवेगळे प्रोटीन असतात. म्हणून जेव्हा दोन्ही मिळवून खाल्ले जाते तेव्हा चांगली सत्व आपल्या शरीरात जातात.
- पचनक्रियेला आराम
वरण-भात पचन क्रियेला आराम देते. तुरडाळ आणि मुगडाळ पचवण्यासाठी सोपी असते. कारण यामधील प्रोटीनला शरीर सहज शोषून घेते. भातसुध्दा पचवण्यास सोपा असतो. भातात कार्बोहायड्रेट भरपूर असते, त्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते.
हेही वाचा :