घरलाईफस्टाईलयंदा पावसाळ्यात कांद्याची नव्हे तर 'हिरव्या वाटाण्याची कुरकुरीत भजी' नक्की ट्राय करा

यंदा पावसाळ्यात कांद्याची नव्हे तर ‘हिरव्या वाटाण्याची कुरकुरीत भजी’ नक्की ट्राय करा

Subscribe

आता लवकरच पावसाळा सुरू होईल, पावसाळा सुरू झाला की अनेकांना गरमागरम चटपटीत भजी खावू वाटतात मात्र प्रत्येक वेळी आपण कांदा भजी, बटाटा भजी, मूग भजी यांचाच आस्वाद घेतो. मात्र या पावसाळ्यात तुम्ही हिरव्या वाटाण्याची भजी चटपटीत भजी नक्की ट्राय करा.

हिरव्या वाटाण्याची भजीसाठी लागणारे साहित्य-

- Advertisement -
  • ताजे हिरवे वाटाणे उकडलेले -3 कप
  • कोंथिबीर -1/2 कप
  • लसूण- 6 पाकळ्या
  • हिरवी मिरची- 4 बारीक कापलेल्या
  • जीरे- 1 चमचा
  • बेसन- 1 ते 1/2 चमचा
  • हींग- 1/4 चमचा
  • कांदा- 2 बारीक कापलेला
  • मीठ- चवीनुसार
  • तेल- आवश्यकते अनुसार

कृती :

  • सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेले हिरवे वाटाणे , कोथिंबीर, मिरची, लसूण आणि जीरे एकत्र करून मिक्सरमध्ये बारिक करून घ्या.
  • त्यानंतर या सर्व मिश्रणामध्ये मीठ, बारीक चिरलेला कांदा , हींग आणि बेसन पीठ टाकून एक जाड पेस्ट तयार करून घ्या.
  • आता एका कढईमध्ये तेल गरम करून घ्या. तेल गरम झाल्यानंतर मध्यम आचेवर एक एक भजी तेलामध्ये सोडा.
  • भजी लालसर सोनेरी रंगाचे झाल्यानंतर एका भांड्यात काढून घ्या.
  • टोमॅटो सॉस बरोबर हिरव्या वाटण्याची भजी सर्व्ह करा.

हेही वाचा :तांदूळ नाही तर बटाट्या पासून बनवा झटपट ईडली

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -