आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर, आणि व्हॉट्सअॅप यांसारख्या प्लॅटफॉर्मवर लोक तासनतास वेळ घालवतात. परंतु सोशल मीडियाचा आपल्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारचा परिणाम होतो. आज आपण जाणून घेऊयात सोशल मीडियाचा आपल्या मानसिकतेवर कोणता परिणाम होतो.
सकारात्मक परिणाम
माहिती मिळते
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला विविध प्रकारची माहिती मिळते. विविध विषयांवर जागरूकता निर्माण होते.सोशल मीडियावरून बातम्यांची माहिती मिळते.
महत्वाच्या घडामोडी
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला महत्वाच्या घडामोडी समजतात. जगात काय घडत याविषयी संपूर्ण माहिती मिळते.
संवाद
संवाद साधण्यासाठी सोशल मीडिया उत्तम माध्यम आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद सहजपणे साधता येतो. लोकांशी संपर्क ठेवण्यासाठी आणि नवीन संबंध निर्माण करण्यासाठी मदत होते.
शिक्षण
करियर, फिटनेस, मानसिक आरोग्य यांसारख्या अनेक गोष्टींबद्दल तुम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळते.
ओळख निर्माण
सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला लोकांविषयी माहिती मिळते. बरेच लोक सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी शेअर करत असतात . त्यामुळे आपल्याला त्यांच्या आवडीनिवडी जाणून घेता येतात.
नकारात्मक परिणाम
मानसिक तणाव आणि चिंता
सोशल मीडियामुळे मानसिक ताणतणाव देखील वाढू शकतो. सतत इतरांशी तुलना केल्यामुळे आपण कुठेतरी मागे पडतो ही भावना निर्माण होते. यामुळे मानसिक तणाव आणि चिंता वाढू लागते.
असुरक्षितता
लाइक्स आणि कमेंट्समुळे मेंदूत डोपामाइनचा स्त्राव होतो, ज्यामुळे सोशल मीडिया व्यसन लागू शकते.
खोटी माहिती आणि अफवा
फेक न्यूज आणि चुकीच्या माहितीमुळे संभ्रम निर्माण होतो.
प्रायव्हसी
हल्ली बरेच लोक सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी शेअर करत असतात अशावेळी तुमची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. सायबर बुलीचा धोका वाढू शकतो.
हेही वाचा : Home Remedies For Headache : डोकेदुखी दूर करण्यासाठी सोपे उपाय
Edited By : Prachi Manjrekar