हल्लीची बरीच कामे एकाच बसून केली जातात. कित्येक ऑफीसमध्ये आठ ते नऊ एकाच जागी कॉम्प्युटरवर काम करण्यात येते. लोकांना बसून काम करणे खूप सोपे आणि आरामदायी वाटते. पण, डॉक्टरांच्या मते बैठी जीवनशैली आरोग्याच्या समस्यांना तक्रारींना आमंत्रण देणारी आहे. अगदी शाळेकरी मुलांपासून ते वृद्धापर्यत पाठदुखी, खांदे दुखणे, हात-पाय दुखणे अशा तक्रारी सुरू होण्याचे कारणही बैठी जीवनशैली आहे. जर तुम्हालाही एकाच जागी बसून काम करण्याची सवय असेल तर अधूनमधून ब्रेक घेणं आवश्यक आहे. आजच्या या लेखातून सविस्तरपण जाणून घेऊयात बैठ्या जीवनशैलीमुळे कोणकोणत्या आजारपणाला आमंत्रण मिळते.
- जेव्हा तुम्ही दिवसभर एकाच जागी बसता तेव्हा शारीरिक हालचाली कमी होतात. यामुळे शरीराचा मेटाबॉलिजम दर मंदावतो. यामुळे शरीरात चरबी साठू लागते.
- बैठ्या कामामुळे गर्भाशयाचे आजार होऊ शकतात.
- दररोज 8 ते 10 तास एकाच जागी बसून काम केल्याने मान आणि मणक्याचे आजार होऊ शकतात.
- बैठ्या कामामुळे स्नायुंमध्ये कडकपणा वाढतो.
- एकाच जागी तासनतास बसून काम केल्याने रक्ताभिसरण मंदावते. याशिवाय चरबी जमा झाल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढते. यामुळे हाय ब्लड प्रेशर आणि हृदयविकाराचा धोका उद्भवतो.
- बैठ्या कामामुळे मेंदूवरही परिणाम होतो. यामुळे चिंता, ताण आणि नैराश्याचा धोका वाढतो.
- एकाच जागी तासनतास बसून काम केल्याने शारीरिक हालचाली होत नाही. शारीरिक हालचालींच्या अभावामुळे मूड स्विंग, थकवा, चिडचिडेपणा वाढू शकतो.
यापासून दूर कसे व्हाल –
- कामाच्या ठिकाणी एकाच जागी बसून काम केल्याने येणाऱ्या शारीरिक तक्रारी टाळण्यासाठी दुपारी जेवल्यानंतर फिरायला जावे.
- सतत एकाच जागी बसून काम असेल तर मध्ये – मध्ये ब्रेक घ्यावा.
- दर अर्ध्या तासाने जागेवरून उठावे.
- फायबरयुक्त आहार घ्यावा.
- दिवसातून 15 मिनिटे तरी व्यायाम करावा.
- पूर्ण झोप घ्यावी.
हेही पाहा –