Tuesday, May 30, 2023
घर मानिनी Health Egg Freezing मुळे मेनोपॉजची समस्या येते?

Egg Freezing मुळे मेनोपॉजची समस्या येते?

Subscribe

आजकाल बहुतांश महिला आपले एग फ्रिज करत आहेत. यामागील मुख्य कारण म्हणजे करियवर अधिक लक्ष देणं. वयाच्या 30 व्या वर्षातील तरुणी सुद्धा एग फ्रिजिंगचा ऑप्शन निवडतात. हा ऑप्शन वय वाढले तरी बाळाला जन्म देण्यासाठीची बेस्ट टेक्निक आहे. त्याचसोबत ज्यांना उशिराने आई व्हायचं आहे त्यांच्याकडे सुद्धा हा ऑप्शन आहे. सध्या एज फ्रिज करण्याचा पर्याय मेट्रो सिटीत फार अधिक वाढला आहे. परंतु एग फ्रिजिंग संदर्भात काही लोकांच्या मनात चुकीच्या गोष्टी किंवा तथ्य आहेत त्यामुळे ते यावर बोलण्यास ही नकार देतात. अशातच आम्ही तुम्हाला तज्ञ नक्की यावर काय म्हणतात हेच सांगणार आहोत.

एग फ्रिजिंगची प्रक्रिया सुरु करण्यासाठी आवश्यक हार्मोन, औषधं, इंजेक्शन सर्वसामान्यपणे 8-11 दिवसांसाठी दिवसातून एकदा किंवा दोनदा दिले जातात. या काळादरम्यान तुमचे शरिर औषधाच्या माध्यमातून कसा रिस्पॉन्स देतेय याचा तपास डॉक्टर करतात. जेव्हा रुग्ण तयार असेल तेव्हा डॉक्टर एग रिट्रिवल सर्जरीमध्ये व्यक्तीचे अंडे काढून प्रक्रिया पूर्ण करतात.

- Advertisement -

तर काही महिला आपले एज वैद्यकिय कारण, आर्थिक तंगी किंवा पार्टनर नसल्याने असे करतात. यासाठी विविध कारणं सुद्धा असू शकतात. सध्या बहुतांश महिला एज फ्रिंज करतात, कारण त्यांना आतापर्यंत आपला परफेक्ट पार्टनर मिळालेला नसतो. एग फ्रिजिंगमध्ये तुमचे काही एग एकत्रित करुन ते फ्रिज केले जातात आणि नंतर अंडाशयात सोडण्यासाठी ठवले जातात. जेणेकरुन जेव्हा तुम्ही प्रेग्नेंसीचा प्लॅन कराल तेव्हा त्याचा वापर करु शकता.

या व्यतिरिक्त गरजेचे नाही की, प्रत्येक महिलेने आपले एग फ्रिज केले पाहिजे. या व्यतिरिक्त डॉक्टरांद्वारे एग फ्रिज केल्यास तुम्हाला त्या संदर्भातील सखोल प्रोसेस कळते. एग फ्रिजिंग तेव्हाच कामी येते जेव्हा एखादी महिला भविष्यात आई बनू शकते. यामध्ये सर्वात मोठे म्हणजे एग फ्रिजिंगमुळे वेळेआधीच मेनोपॉज होत नाही हे सर्व महिलांनी लक्षात ठेवावे असे तज्ञ सांगातात.

- Advertisement -

प्रत्येक महिन्याला महिलेच्या शरिरात काही एग तयार होत राहतात आणि ते विकसित होत राहतात. एग फ्रिजिंग दरम्यान, एग अशा प्रकारे सेट केले जातात ते तुम्ही नंतर कधीही त्याचा वापर करु शकता. एग फ्रिजिंगचा मेनोपॉजवर कोणताही प्रभाव पडत नाही. तर एग फ्रिजिंग केवळ सिंगल लोकांसाठी आहे असे नाही. बहुतांश लोक लॉन्ग टर्म रिलेशनशिप आणि लग्नासाठीचा विचार करतात तेव्हा सुद्धा एग फ्रिजचा पर्याय निवडू शकतात.


हेही वाचा- ‘या’ 5 कारणांमुळे सतत दुखते कंबर, महिलांनो वेळीच लक्ष द्या

- Advertisment -

Manini