Saturday, April 20, 2024
घरमानिनीHealthEgg Freezing साठी योग्य वय, का वाढतोय याचा महिलांमध्ये ट्रेंड?

Egg Freezing साठी योग्य वय, का वाढतोय याचा महिलांमध्ये ट्रेंड?

Subscribe

गेल्या काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री प्रियंका चोपडा हिने या गोष्टीचा खुलासा केला होता की, जेव्हा ती ३० वर्षाची होती तेव्हा तिने एग फ्रिजिंग टेक्निकच्या मदतीने आपले एग फ्रिज केले होते. सरोगेसीच्या माध्यमातून प्रियंका एका मुलीची आई झाली आबे. आजकाल महिला या आपल्या करियरला प्राथमिकता देत असल्याने ते लवकर बेबी प्लॅनिंग करत नाहीत. अशातच तरुणी लग्नानंतर करियरवर फोकस करण्यासाठी एग फ्रिजिंग करणे हा बेस्ट पर्याय असल्याचे मानतात. नक्की एग फ्रिजिंक काय आहे आणि त्यासाठी वय काय असावे अशा सर्व गोष्टी आपण जाणुन घेणार आहोत.

एग फ्रिजिंग म्हणजे काय?
वाढत्या वयासह काही गोष्टी बदलू लागतात. जसे की, विचार करणे किंवा एखाद्या गोष्टीला अधिक प्राथमिकता देणे. हेच कारण आहे की, याआधी मुली आपलं घर, लग्न आणि मुलांना प्राथमिकता देत होत्या. पण आज त्या आपल्या करियरबद्दल अधिक जागृक झाल्या आहेत. आजकालाच्या बहुतांश तरुणांचे हेच म्हणणे असते की, ते जो पर्यंत सेटल होत नाहीत तो पर्यंत लग्न करणार नाहीत. याचा परिणाम कुठे ना कुठेतरी त्यांच्या प्रजनन क्षमतेवर सुद्धा होतो. सायनन्सनुसार, वाढत्या वयासह महिलांमध्ये प्रजनन शक्ती कमी होऊ लागते. हिच गोष्ट लक्षात घेचा विज्ञानाने खुप प्रगती केली आहे.

- Advertisement -

एग फ्रिजिंग एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये महिलांची प्रजनन क्षमता संरक्षित राहते. जेणकरुन महिला भविष्यात आई होऊन आपला परिवार वाढवू शकतात. तर एग फ्रिजिंग महिलांमधील फर्टिलटी कायम ठेवण्याची एक पद्धत आहे. एग फ्रिजिंगमध्ये ओवरी ते मॅच्युअर एगला काढले जाते. लॅबमध्ये शून्य तापमानावर फ्रीज केले जाते. महिलांना जेव्हा त्या अंड्यांची गरज पडते तेव्हा ते शुक्राणू सोबत मिळून गर्भाशयात टाकले जातात. मेडिकल रुपात एग फ्रिजिंगला क्राइयोप्रिजर्वेशन असे म्हटले जाते.

- Advertisement -

एग फ्रिजिंसाठी योग्य वय काय?
२० ते ३० वयोगटातील महिला आपले एग फ्रिज करु शकतात. असे पाहिले गेले आहे की, वयाच्या पस्तीशी पर्यंत पोहचल्यानंतर महिलांची प्रजनन क्षमता कमी होऊ लागते. वयाच्या ३० व्या वर्षाआधी आणि २० वर्षानंतरच्या महिलांचे एग अधिक स्वस्थ आणि उच्च प्रजनन क्षमतेचे असतात. या व्यतिरिक्त तुम्हाला एग फ्रिजिंग करायचे असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवावी की, २०-३० वय यासाठी बेस्ट आहे. या प्रक्रियेसाठी कमीत कमी २५ ते ३० एग जरुर फ्रीज करु शकता.


हेही वाचा- आईच्या दूधापासून ज्वेलरी बनवण्याचा नवीन ट्रेंड

- Advertisment -

Manini