Monday, March 17, 2025
HomeमानिनीHealthEgg Health Benefit : अंडी खा, दिर्घायुषी व्हा

Egg Health Benefit : अंडी खा, दिर्घायुषी व्हा

Subscribe

‘संडे हो या मंडे, रोज खावो अंडे’ हे आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. अंड्यामध्ये प्रोटिन्स, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन बी 12, ओमेगा 3 फॅटी ऍसिड, कोलीन सारखे पोषक घटक आढळतात. अंड हे पूर्ण अन्न आहे. अंड पूर्ण अन्न असल्याने सकाळच्या नाश्त्यात अंड खाल्ले जाते. अंड खाल्लाने शरीर तंदुरूस्त राहण्यासाठी फायदा होतो. नुकतंच अंड्यावर एक संशोधन करण्यात आले आहे. या संशोधनानुसार अंडी खाणाऱ्यांसाठी एक खुशखबर सांगण्यात आली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, नियमित अंडी खाल्याने शरीर निरोगी राहतेच शिवाय तुमचे आयुष्य वाढवते असे या संशोधनात सांगण्यात आले आहे. चला तर मग जाणून घेऊयात, अंडी खाल्ल्याने शरीरावर कसा परिणाम होतो आणि दिर्घायुषी होण्यासाठी कशी मदत होते.

संशोधन काय सांगते – 

या संशोधनानुसार, अंड्यामुळे साइलंट किलर असणाऱ्या आजारांपासून मुक्तता होते. जवळपास या आजारांचा धोका 29% पर्यत कमी होतो. मेलबर्नमधील मोलार्श यूनिवर्सिटीमध्ये हे संशोधन करण्यात आले आहे. यात आठवड्यात 5 ते 6 वेळा अंडी खाण्याऱ्यांना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगामुळे मृत्यु होण्याचा धोका 29% कमी होतो. जी व्यक्ती महिन्यातून एक किंवा दोन वेळा अंडी खाते, त्यांना या आजारांचा धोका अधिक असतो. याउलट जी व्यक्ती दररोज अंडी खाते, अशा व्यक्तीला हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगामुळे मृत्यु होण्याचा धोका 15% कमी होतो, असे सांगण्यात आले आहे.  म्हणजेच तुमचे आयुष्य वाढते, तुम्ही दिर्घायुषी होता.

अंडी खाण्याचे फायदे –

  • प्रोटिन्सचा उत्तम स्त्रोत म्हणून अंड्याकडे पाहिले जाते. अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटिन्स असल्याने शरीरातील
  • पेशींची दुरूस्ती होण्यासाठी अंडी जरूर खावीत.
  • अंडी खाल्ल्याने शरीरातील स्नायू मजबूत होतात.
  • अंड्यामध्ये व्हिटॅमिन ए आढळते. यामुळे डोळे निरोगी राहण्यासाठी फायदा होतो.
  • अंड्यामध्ये असणारे कोलीन मेंदूच्या विकासासाठी आवश्यक असते. याशिवाय नियमित अंडी खाल्ल्याने अल्झायमरचा धोका कमी होतो.
  • अंड्यामधील बायोटिन आणि प्रोटिन्स केस निरोगी ठेवतात.

 

 

 

 

हेही पाहा –

Manini