बदलती लाइफस्टाइल आणि चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे केसांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत. हेअर फॉल , केसात कोंडा होणे, केस पांढरे होणे अशा तक्रारी तुम्हालाही जाणवत असतील तर ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला हेअर फॉलवर एक घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे हेअर फॉलची समस्या नक्कीच कमी होऊ शकते. हेअर फॉल रोखण्यासाठी तुम्हाला अंड वापरणे फायदेशीर ठरेल. अनेकांचा असा समज असतो की, अंडी केसांना वापरल्याने केसांना वास येतो. पण, तुम्ही जर योग्य पद्धतीने केसांसाठी अंडी वापरलीत तर केसांना अंड्याचा वास राहणार नाही आणि हेअर फॉल थांबेल.
अंडी आणि ऑलिव्ह ऑइल –
हेअर फॉल रोखण्यासाठी केस मुळापासून रोखणे गरजेचे असते. केस मजबूत करण्यासाठी अंडी आणि ऑलिव्ह ऑइल उपयुक्त ठरेल. अंड फेटून त्यात ऑलिव्ह ऑइल मिक्स करावे. तयार मिश्रण केसांवर लावावे. यामुळे केस मुळापासून मजबूत होण्यासाठी उपयुक्त ठरेल.
अंड आणि दही –
अंड आणि दह्याचे मिश्रण केसांची शाइन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरते. अंड आणि दह्यातून पोषण मिळते, ज्यामुळे केस मऊ होतात.
अंड आणि लिंबू –
अंड्याचा आणि लिंबाचा हेअर मास्क केसांच्या स्कॅल्पवर लावल्यास केसातील कोंडा कमी होतो. या हेअर मास्कमुळे केसगळथी थांबते आणि केस मुळापासून मजबूत होतात.
अंड आणि कोरफड –
केसांची वाढ थांबली असेल तर अंड आणि कोरफडीचे मिश्रण केसांवर लावावे. तुम्ही अंड आणि कोरफडीचे मिश्रण करून केसांवर हेअर मास्क लावू शकता. या हेअर मास्कमुळे केसांच्या तक्रारी कमी होण्यास सुरुवात होते.
अंड्याचा शॅम्पू –
केसांच्या तक्रारी रोखण्यासाठी अंड्याचा शॅम्पू वापरता येईल. अंड्यामधील पोषकतत्वांमुळे केसांना प्रोटिन मिळेल आणि स्कॅल्प निरोगी राहील.
अंड आणि खोबरेल तेल –
केसांच्या तक्रारी कमी करण्यासाठी अंड आणि खोबरेल तेलाचे मिश्रण फायदेशीर ठरेल. यासाठी एका बाऊलमध्ये अंड फेटून घ्यावे. त्यात 2 ते 3 चमचे खोबरेल तेल मिक्स करावे. तयार मिश्रण केसांच्या स्कॅल्पवर लावावे. किमान अर्धा तास केसांवर लावून ठेवावे.
हेही पाहा –