अंड आरोग्यासाठी फायदेशीर असते. मात्र त्याच्या उग्र वासामुळे ते कधीकधी खाऊ नये असे होते. खरंतर जेव्हा आपण अंड्याचा एखादा पदार्थ तयार करतो तेव्हा ते भांड धुतल्यानंतर त्याचा वास काही दिवस राहतोच. अशातच त्याच भांड्यात पुन्हा जेवण कसे बनवायचे असा प्रश्न बहुतांशजणांना पडतो. त्यामुळे अंड्याचा वास भांड धुतल्यानंतर ही येत असेल तर पुढील काही टीप्स वापरू शकता.
भांड्याला येणारा अंड्याचा वास तुम्ही बेसन आणि लिंबूचा वापर करू शकता. त्याचसोबच अधिकच अंड्याचा वास येत असल्यास त्यावर बेसन आणि गरम पाण्याचा वापर करू शकता. त्यानंतर भांड धुतल्यानंतर लिंबू घासून पुन्हा पाण्याने धुवू शकता.
या व्यतिरिक्त बहुतांशजण अंड्याचा वास दूर करण्यासाठी व्हिनेगरचा वापर करावा असे सांगतात. काहीजण तर चहाचे पाणी, मीठाचे पाणी वापरून ते धुवावे असा सल्ला देतात. त्याचसोबत तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करून अंड्याचा येणारा दुर्गंध दूर करू शकता. यासाठी दुर्गंध येणाऱ्या भांड्यावर बेकिंग सोडा लावून ठेवा. थोड्यावेळाने ते भांड स्वच्छ पाण्याने धुवा.
हेही वाचा- कुकरचा रबर सैल झाला असेल तर वापरा ‘या’ टिप्स