Tuesday, February 18, 2025
HomeमानिनीEggs Shell Benefits : अंड्याच्या कवचापासून बनवा खत

Eggs Shell Benefits : अंड्याच्या कवचापासून बनवा खत

Subscribe

ज्या गोष्टींना आपण बिनकामाचे किंवा कचरा समजून फेकून देतो तीच गोष्ट अनेकदा उपयोगी आणि कामाची निघू शकते. जसे की चहापावडर, भाजी आणि फळांच्या साली, ज्यांना आपण सहसा कचऱ्याच्या डब्यात फेकून देतो. खरंतर हे सगळे पदार्थ झाडांसाठी फायदेशीर असतात. यापैकीच एक म्हणजे अंड्याचे कवच. यांना कचरापेटीत टाकण्याऐवजी जर त्यांचा योग्य पद्धतीने वापर केला गेला तर तुमच्या बागेसाठी हे फायदेशीर ठरू शकतं. खरंतर अंड्याच्या कवचामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतं. जे झाडांच्या वाढीसाठी आवश्यक असतं. यासाठीच जाणून घेऊयात अंड्याच्या कवचांचा उपयोग नेमका कसा करावा याबद्दल.

हेही वाचा :  Online Dating : सावधान ! ऑनलाइन डेटिंग करताय ?

अंड्याच्या कवचांचा खतासाठी कसा कराल वापर ?

अंड्याच्या कवचापासून खत तयार करण्यासाठी सर्वात आधी यांना धुवून घ्या. आणि 3 ते 5 दिवसांकरता चांगलं सुकवून घ्या. यामुळे कवचे खराब होणार नाहीत. सुकवल्यानंतर यांना मिक्सरमध्ये टाकून त्याची पावडर तयार करुन घ्या. आता या पावडरचा घराच्या गार्डनमध्ये थेट उपयोग केला जाऊ शकतो. या पावडरच्या एका चमच्यामध्ये साधारण 750 ते 800 मिलिग्रॅम इतके कॅल्शियम आणि अन्य पोषकतत्त्वं देखील यामध्ये उपलब्ध असतात. याचा प्रयोग कंपोस्टिंगमध्ये आणि खताची गुणवत्ता वाढवण्यासाठीही केला जातो.

Eggs Shell Benefits: Make fertilizer from egg shells

अंड्याचे कवच बारीक करुन उकळल्यास काय होते ?

अंड्याचे कवच मिक्सरमध्ये बारीक करुन उकळल्यास तुम्ही झाडांसाठी चांगले खत तयार करू शकता. यासाठी तुम्हाला तयार कवचांची पावडर चहाप्रमाणे पाण्यात उकळत ठेवावी लागेल. नंतर हे पाणी थंड झालं की थेट तुम्ही झाडांमध्ये ते टाकू शकता. यामुळे तुमच्या झाडांची वाढ तर होईलच पण सोबत झाडांना फुलंदेखील भरपूर येतील. खरंतर हे पाण्यापासून तयार करण्यात आलेलं हे लिक्विड खत आहे. ज्याची खराब होण्याची शक्यता अधिक असते. अशात लवकरात लवकर खत संपवण्याचा प्रयत्न करा.

हेही वाचा : Benefits Of Star Anise: चक्रफुलाचे अगणित फायदे


Edited By – Tanvi Gundaye

Manini