Friday, December 13, 2024
Maharashtra Assembly Election 2024
घरमानिनीElectric Geyser : थंडीत गीझर वापरताना घ्या ही काळजी

Electric Geyser : थंडीत गीझर वापरताना घ्या ही काळजी

Subscribe

हिवाळा सुरु होताच थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने आंघोळ करतात. थंडी सुरू झाल्यावर गीझरचा वापर सुरू होतो. वातावरणात गारवा असल्याने गरम पाणी आंघोळीसाठी वापरले जाते. गरम पाणी गॅसवर तापवण्याऐवजी गीझर वापरण्याला अधिक प्राधान्य दिले जाते. पण, गीझरचा वापर करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात, कारण गीझरचा स्फोट होण्याच्या अनेक घटना आपण पाहतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला थंडीत गीझर वापरताना काय काळजी घ्यावी याबद्दल काही टिप्स सांगणार आहोत.

गीझर वापरताना घ्या ही काळजी – 

अनेकजण गरम पाणी करण्यासाठी गीझर वापरतात. पण, वापरून झाल्यावर गीझर बंद करण्यास विसरतात. वास्तविक हे धोकादायक असते. जास्त वेळ गीझर सुरू ठेवल्यावर त्याचा स्फोट होण्याची शक्यता अधिक असते. अशावेळी तुम्ही ऑटोमॅटिक गीझर वापरायला हवेत.

- Advertisement -

घरातील गिझर कायम उंचीवर असायला हवेत. ज्यामुळे शॉक लागण्याची शक्यता कमी होते. याशिवाय लहान मुलांना गीझर हाताळू देऊ नये.

गीझरची तार तांब्याची नसल्यास स्फोट होण्याचा धोका जास्त असतो. त्यामुळे गीझरची अर्थिंग व्यवस्थित असल्याची खात्री करावी.

- Advertisement -

गीझर कायम मॅकेनिककडून बसवून घ्यावा. स्वत: बसवायचा प्रयत्न करू नका.

पैसे वाचवण्यासाठी स्वस्त गीझरची खरेदी करू नये. स्वस्त गीझर वापरण्यास सुरक्षित असतात. त्यामुळे गीझर खरेदी करताना त्यावरील सुचना अवश्य वाचायला हव्यात.

गीझर जुना असेल तर वेळोवेळी सर्विसिंग होणे आवश्यक आहे.

वीजेचा झटका टाळण्यासाठी 10 ते 15 मिनीटे आधीच गीझर सुरू करावा आणि पाणी गरम करून घ्यावे.

गीझर वापरताना सर्वात महत्त्वाचे पाणी असते. जेव्हा तुम्ही गिझर सुरू करता तेव्हा त्यात पाणी असणे आवश्यक आहे. पाण्याशिवाय गीझर सुरू केल्याने स्फोट होऊ शकतो.

 

 

 

 

हेही पाहा –


Edited By – Chaitali Shinde

- Advertisment -

Manini