Monday, March 17, 2025
HomeमानिनीElectricity Bill : वीजबिल कमी करण्यासाठी काही सोपे उपाय

Electricity Bill : वीजबिल कमी करण्यासाठी काही सोपे उपाय

Subscribe

आता उन्हाळ्याच्या दिवसांना सुरूवात होत आहे. तसं पाहायला गेलं तर साधारणपणे हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात बिल जास्त असते. अशा परिस्थितीत, आपल्या सर्वांना नेहमीच असे वाटते की उन्हाळ्यात आपण कूलर, पंखे आणि उपकरणे वापरतो, त्यामुळे बिल जास्त येते. कधीकधी अशी परिस्थिती दिसून येते की फक्त पंखा आणि रेफ्रिजरेटर चालवल्याने देखील हजारो रुपये बिल येते. जर तुम्ही वाढत्या वीज बिलामुळे त्रस्त असाल आणि ते कमी करण्यासाठी उपाय शोधत असाल तर तुम्ही काही सोप्या उपायांचाही अवलंब करू शकता. आजच्या या लेखात जाणून घेऊयात अशा काही उपायांबद्दल. ज्यांच्या मदतीने तुम्ही घराचे बिल मोठ्या प्रमाणात कमी करू शकता.

एलईडी दिवे वापरा

जर तुमच्या घरात 100 वॅटचा बल्ब बसवला असेल तर तो ताबडतोब बदला. यासोबतच, जर जुने सीएफएल बसवले असेल तर तेदेखील काढून टाका आणि एलईडी लाईट्स वापरा. हे दिवे खूप कमी वीज वापरतात आणि बराच काळ टिकतात देखील. एलईडी लाईट्स वापरून तुम्ही 50 ते 70 टक्के वीजवापर कमी करू शकता.

स्मार्ट पॉवर स्ट्रिप्सचा वापर करा 

जर तुम्ही तुमच्या घरात बल्ब, पंखे, फ्रीज इत्यादी जास्त प्रमाणात वापरत असाल तर वापरात नसलेली इलेक्ट्रॉनिक उपकरणे जवळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ते ताबडतोब बंद करा. तसेच स्मार्ट पॉवर स्ट्रिप्स वापरल्याने तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स पूर्णपणे बंद करू शकता. तुम्ही पॉवर स्ट्रिप बंद करताच, सर्व उपकरणे पूर्णपणे बंद होतील.

Electricity Bill Some simple solutions to reduce the electricity bill

वापरात नसलेले इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट्स बंद करा 

बरेचदा लोक टीव्ही, मायक्रोवेव्ह किंवा लॅपटॉप सारखी उपकरणे चालू ठेवतात. त्यांना स्टँडबाय मोडमध्ये ठेवल्याने देखील जास्त वीज खर्च होते. ही उपकरणे बंद करणे हा वीज वाचवण्यासाठी चांगला उपाय ठरू शकतो.

योग्य सेटिंग्जसह सोलार पॅनेल वापरा 

जर तुम्ही एअर कंडिशनर किंवा रेफ्रिजरेटर वापरत असाल तर त्यांना कमी तापमानात ठेवल्याने जास्त वीज लागते. एअर कंडिशनर 24-26°C वर आणि फ्रीजर 18°C वर सेट करा. यामुळे वीज बचत होते आणि बिलही कमी येते. यासोबतच, जर तुमच्याकडे सोलर पॅनल बसवण्याची सुविधा असेल, तर ते गॅरेज, छतावरील किंवा बाहेरील जागेत बसवा. सौर पॅनेल सूर्याच्या उर्जेचा वापर करून दिवसभर तुमच्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांना उर्जा देण्यास मदत करू शकतात.

पॉवर-सेव्हिंग मोड वापरा

आजकाल बहुतेक लोक स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स वापरतात. त्यामुळेच टीव्ही, लॅपटॉप आणि मोबाईल फोनमध्ये पॉवर-सेव्हिंग मोड देखील उपलब्ध असतो. या पद्धती वापरल्याने जास्त ऊर्जा वापर वाचण्यास मदत होऊ शकते. यामुळे बॅटरी जास्त काळ टिकते आणि फोन वारंवार चार्ज करण्याची गरज भासत नाही.

हेही वाचा : Fashion Tips : ऑफिसमध्ये स्टायलिश दिसण्यासाठी फॅन्सी टॉप्स


Edited By – Tanvi Gundaye

Manini