आपल्या घरात अनेक वस्तूंचे बॉक्ससेस असतात. तसेच अनेक रिकाम्या बॉटल्स देखील असतात. अशातच आपण अनेकवेळा हे बॉक्ससेस आणि बाटल्या फेकून देतो. आणि आपण त्याचा वापर पुन्हा करत नाही. अशावेळी या रिकाम्या बॉक्ससेस आणि बॉटलचे आपण अनेक फायदे करून घेऊ शकतो. तसेच आजकाल प्रत्येकजण परफ्यूम वापरतो. पण हा परफ्यूम वापरून झाला की बरेच लोक परफ्यूमची बॉटल फेकून देतात. पण आता तुम्ही फेकत असाल तर जरा थांबा. तसेच परफ्यूमची बॉटल फेकून न देता या टिप्सच्या मदतीने पुन्हा एकदा तुम्ही परफ्यूमची बॉटल वापरू शकता.
रिकाम्या परफ्यूमच्या बाटलीचा असा करा वापर
जरा का तुमच्याकडे रिकाम्या बॉटल असतील तर या बाटलीमध्ये तुम्ही नव्याने घरी बनवलेला परफ्यूम त्यात भरू शकता. तसेच जर का तुम्हाला परफ्यूम नसेल बनवायचा तर त्या बॉटलमध्ये तुम्ही कोणत्याही प्रकारचे द्रव्य पदार्थ त्यात भरून ठेवू शकता. अनेक वेळा आपण बाहेर फिरायला जातो अशावेळी या रिकाम्या बॉटल्समध्ये कोणत्याही प्रकारच्या लहान वस्तू ठेवू शकतो.
घर डेकोरेशन साठी परफ्यूमची बॉटल वापरा
तुम्ही परफ्युमच्या बाटलीनेही घर देखील सजवू शकता. तुम्हाला फक्त एक रिकामी बाटली घायची आहे. आणि मग त्यात पाणी घालायचे आहे आणि त्यात 2-5 फुले त्या बॉटल्समध्ये टाकायची आहेत. तसेच तुम्हाला हवे असल्यास फुलाऐवजी तुम्ही परफ्युमच्या बाटलीत फुलांची पानेही टाकू शकता. तुम्ही ही परफ्युमची बाटली घराच्या कोणत्याही कोपऱ्यात ठेवू शकता. ज्यामुळे घराला एक छान लूक मिळेल.
रोप लावण्यासाठी वापरा परफ्यूमची बॉटल
बरेच लोक परफ्यूमच्या मोठ्या बाटल्या विकत घेतात. आणि या बाटल्या संपल्या कि तश्याच पडून राहतात. तर आता या बाटल्यांमध्ये तुम्ही रोपे लावू शकता. तसेच इनडोअर प्लांट्सचे अनेक झाडी आहेत ज्यांना वाढण्यासाठी फक्त पुरेसे पाणी लागते. अशावेळी ही झाडे वाढवण्यासाठी तुम्ही जुन्या परफ्यूमच्या बाटल्याचा पुन्हा वापरू शकता. यामुळे बाटल्या देखील वापरल्या जातील आणि झाडे सुद्धा सुंदर दिसतील.
शोपीस बनवण्यासाठी परफ्यूमची बॉटल बेस्ट
परफ्यूमच्या बॉटल्स या छान रंगीबेरंगी असतात. तसेच जर का तुम्हला घरात काही डेकोरेशन करायचे असल्यास या बॉटलचा तुम्ही रियुज करू शकता. तसेच परफ्यूमच्या बॉटल्सचा शेप आणि आकार हा आकर्षक असतो त्यामुळे त्यात तुम्ही छोटे रंगीत दगड आणि खडे टाकून या बॉटल्सला नवा लूक देऊ शकता. यामुळे घराची शोभा वाढेल आणि शोपीस विकत घेण्याचे पैसे देखील वाचतील.