घरलाईफस्टाईलसुट्टीतही मुलं मोबाईल मध्ये बिझी ,मग वापरा या ट्रीक्स

सुट्टीतही मुलं मोबाईल मध्ये बिझी ,मग वापरा या ट्रीक्स

Subscribe
हल्ली मोठयांसोबत लहानांनाही मोबाईलचे व्यसन लागले आहे. मुले सुट्टी असेल त्या दिवशी सतत मोबाइलला घेऊन बसत आहेत. अशाने लहान वयातच मुलांना चष्मा लागणे, नजर तिरपी होणे अशा समस्या भेडसावत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस पालकांच्या चिंतेत भर पडत चालली आहे. एकूणच पालक आपल्या पाल्याला स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी हर तर्हेने प्रयन्त करत आहे. मात्र, असे असले तरी पालकांनी मुलांवर जबरदस्ती करूनही चालणार नाहीय अशाने मुले स्क्रीन टाइमसाठी आणखी उत्सुक होतील.
  • तुमच्या मुलांनी इतर वेळी स्क्रीनपासून दूर राहावे असे तुम्हाला वाटत असल्यास तर त्यांना इतर कामात गुंतवून ठेवा. यासाठी मोकळ्या वेळेत किंवा सुटीच्या दिवशी त्यांना पुस्तके वाचायला लावा, त्याच्यासोबत गप्पागोष्टी तुम्ही करू शकता.

How Too Much Screen Time Affects Kids' Eyes: Tips to Prevent Eye Strain | Children's Hospital of Philadelphia

  • यासोबतच तुम्ही त्यांना किचनमधील कामे शिकवू शकता. जसे की भाज्या कापणे, सोलणे किंवा भाज्या निवडणे, तांदूळ निवडणे अशी कामे केल्याने ते स्वावलंबी तर बनतीलच पण त्यासोबत त्यांची तुम्हाला कामात मदत होईल.
  • तुम्ही सुट्टीत मुलांना एखाद्या ऍक्टिव्हिला सुद्धा पाठवू शकता. जसे पेंटिंग, ट्रेसिंग अशाने मुले व्यस्त राहतील. यासोबतच तुम्ही घरी सुद्धा मुलांना काही गोष्टी शिकवू शकता जसे की चित्र कापून पेस्ट करण्यास सांगणे, कोलाज काम करणे, टी-शर्ट रंगवायला सांगा.
  • जगात काय सुरु आहे आजूबाजूला काय घडतंय हे शिकविण्यासाठी मुलांना वर्तमान पत्र वाचायला लावा. याने मुले स्क्रीनपासून दूर राहतीलच सोबत त्याचे वाचन सुधारेल.
  • इनडोअर गेम्स मुलांना आणून द्या. जसे की, लुडो, कॅरम, बुद्धिबळ,हे गेम्स तुम्ही सुद्धा मुलांसोबत खेळू शकता. ज्याने तुमच्यातील बॉण्डिंग वाढेल.
  • मुलांना गार्डनिंग करायला शिकवू शकता, अशाने मुलांची निसर्गाशी नाळ जोडलेली राहील. त्यांना झाडांचे महत्व पटवून द्या. असे केल्याने मुले स्क्रीन टाइम पासून दूर राहतील. तुम्ही दररोज मुलांना सोसायटीच्या बागेत किंवा उद्यानात पिकनिकला घेऊन जाऊ शकता.
  • मुलांना आवडतात त्या विषयांवर त्यांच्याशी बोला. ज्याने मुलांमधील वक्तृत्व सुधारेल. मुलांना ऑडिओ बुक्स ऐकवायला लावा.

हेही वाचा; ‘या’ उपायाने दूर करा कपड्यांवरील चिवट डाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -