Monday, February 19, 2024
घरमानिनीFashionप्रत्येक महिलेकडे 'या' 8 प्रकारच्या साड्या असायलाच हव्यात

प्रत्येक महिलेकडे ‘या’ 8 प्रकारच्या साड्या असायलाच हव्यात

Subscribe

वेस्टर्न कपड्यांपेक्षा महिला साडीमध्ये अधिक आकर्षक दिसतात. परंतु तुम्हाला माहित आहे साड्यांचे मुख्य किती प्रकार आहेत. वारंवार बाजारात अनेक प्रकारच्या साड्या येतात.

भारतीय संस्कृतीमध्ये साडी महिलांचा प्रमुख आणि आवडता पेहराव आहे. अलीकडच्या नव्या काळातही अनेक महिला सण-समारंभामध्ये साडी नेसणं पसंत करतात. वेस्टर्न कपड्यांपेक्षा महिला साडीमध्ये अधिक आकर्षक दिसतात. परंतु तुम्हाला माहित आहे का, साड्यांचे मुख्य किती प्रकार आहेत? वारंवार बाजारात अनेक प्रकारच्या साड्या येतात. परंतु भारतामध्ये अश्या काही प्रमुख साड्या आहेत. ज्या प्रत्येक महिलेकडे प्रामुख्याने असायलाच हव्या.

  • पैठणी


पैठणी साडी महाराष्ट्रामधील पैठण शहरामध्ये तयार केली जाते. त्यामुळे या साडीला पैठणी म्हटलं जातं. ही भारतातील सर्वात महागड्या साड्यांपैकी एक आहे. या साडीच्या पदरावर मोराची नक्षी असते. ही साडी प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे.

- Advertisement -
  • कांजीवरम


तमिळनाडूच्या कांचीपुरममध्ये या साडीची निर्मीती केली जाते. त्यामुळे या साडीला कांचीपुरम असं नाव देण्यात आलं आहे. ही साडी बनवण्यासाठी शहतूतच्या रेशमाचा वापर केला जातो. या साडीची बॉर्डर आणि पदर एकाच रंगाचा असतो.

  • बनारसी

Janhvi Kapoor Wears Blue Banarasi Silk Saree For “Mili” Promotions! - Sacred Weavesबनारसी साडी बनारस आणि त्याच्या आसपासच्या शहरामध्ये बनवली जाते. प्राचीन काळामध्ये या साडीमध्ये सोन्याची किंवा चांदीची तार लावली जायची. परंतु आता या साडीमध्ये कृत्रिम तारांचा वापर केला जातो. भारतातील काही ठिकाणी लग्न समारंभामध्ये बनारसी साडी आवडने नेसली जाते.

- Advertisement -
  • पेशवाई

मिस्टर अ‍ॅण्ड मिसेस चांदेकर! पाहा, सिद्धार्थ व मितालीचा वेडिंग अल्बम - Marathi News | marathi actor siddharth chandekar and mitali mayekar wedding album | Latest filmy News at Lokmat.comही साडी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी तयार केली जाते. या साडीचा कपडा खूप सॉफ्ट असून या साडीला पेशवाई साडी असं नाव देण्यात आलं आहे. पेशव्यांच्या काळात अश्या पद्धतीची साड्यांचा वापर केला जायचा.

  • साऊथ इंडियन

Check Out: Anupama Parameswaran And Her Love For South-Indian Sarees

मोती किंवा पांढऱ्या रंगाची कॉटन साडी प्रत्येक महिलेकडे असायलाच हवी. या साड्यांचा वापर दक्षिण भारतात केला जातो. मात्र अलीकडे भारतातील अनेक महिला या साडीला पसंती देतात.

बांधणी


बांधणी साडीला बंधेज साडीच्या नावाने देखील ओळखले जाते. ही साडी गुजरात आणि राजस्थानमध्ये तयार केली जाते. ही साडी विविध रंगांमध्ये असते. ही महिलांमध्ये खूप लोकप्रिय साडी आहे.

  • चिकनकारी

Janhvi Kapoor Goes Full Desi in Chikankari Saree And Hot Blouse at Awards Show - See Her Beautiful Pics

मुघलांद्वारे सुरू केलेल्या लखनऊच्या प्राचीन कढाई कलेला चिकेन म्हटलं जातं. सुरूवातीला ही कढाई मलमलच्या पांढऱ्या कपड्यावर तयार केली जायची. आता रेशम, शिफॉन, नेट यांसारख्या कपड्यांवर ही साडी तयार केली जाते.

  • खादी कॉटन


खादी कॉटन साड्यांची निर्मिती गुजरात तसेच पश्चिम बंगालमध्ये देखील केली जाते. या साड्यांचा वापर प्रामुख्याने उन्हाळ्यात केला जाते. या साड्यांवर विविध प्रकारचे नक्षी काम देखील केलेले असते.


हेही वाचा :

सेलिब्रेटींच्या ‘या’ दागिन्यांना आहे सर्वांधिक मागणी

- Advertisment -

Manini