घरलाईफस्टाईलमहिलांनो 'हे' 5 सेफ्टी टूल्स बॅगेत जरुर ठेवा

महिलांनो ‘हे’ 5 सेफ्टी टूल्स बॅगेत जरुर ठेवा

Subscribe

एकट्याने प्रवास करताना बहुतांश महिलांना आपल्या सुरक्षिततेची काळजी वाटत राहते. खासकरुन संध्याकाळनंतर महिलांना एकट्याने प्रवास करताना भीती वाटते. अशातच तुम्ही तुमच्या हँन्डबॅगेत काही सेफ्टी टूल्स ठेवले पाहिजेत. यामुळे एखादी आपत्तीजनक स्थिती निर्माण झाल्यास तरीही तुम्ही त्याचा पटकन वापर करु शकता. घरातू निघताना जसे ब्युटी प्रोडक्ट्स बॅगेत ठेवता. त्याचप्रमाणे सेफ्टी टूल्स ही जरुर तुमच्या बॅगेत असलेच पाहिजेत.

-पेपर स्प्रे

- Advertisement -


महिलांनी आपल्या बॅगेत पेपर स्प्रे ठेवलाच पाहिजे. पेपर स्प्रेची लहान बॉटल तुम्हाला एखाद्या मोठ्या धोक्यापासून दूर ठेवण्यास मदत करेल. मार्केटमध्ये विविध आकाराचे पेपर स्प्रे सहज मिळतात.

-कैची

- Advertisement -


ऑफिस पर्स किंवा दररोजच्या कामात कैचीचा वापर जरुर केला जातो. अशातच तुम्ही आपल्या हँन्डबॅगेत सुद्धा कैची ठेवा. यामुळे तुमची काही कामे सहज होतीलच पण तुमच्या सुरक्षिततेसाठी ही कामी येईल.

-सेफ्टी पिन्स


सेफ्टी पिन्स महिलांच्या डेली रुटीनमध्ये वापरलेच जाते. सर्वसामान्यपणे ड्रेसची शिलाई निघाली असेल तर सेफ्टी पिन लावून आपण ते झाकू शकतो. पण सेफ्टी पिन तुमच्यासाठी सेफ्टी टूल म्हणून बेस्ट पर्याय आहे.

-नेलकटर


आपली सुरक्षितता राखण्यासाठी प्रत्येक महिलेने नेटकर किंवा स्विस नाइफ स्वत:जवळ ठेवाले. यामुळे तुम्ही हल्लेखोरावर लगेच पलटवार करु शकता.

-चावी


एकट्याने प्रवास करताना तुम्ही एखादी बनावट चावी जरुर तुमच्यासोबत ठेवा. जेव्हा हल्लेखोर तुमच्यावर हल्ला करेल तेव्हा त्याच्यावर चावीच्या पुढच्या टोक तुम्ही पलटवार करा.


हेही वाचा- सॅनेटरी नॅपकीनच्या वेंडिंग मशीनचा ‘असा’ करा वापर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -