उन्हाळ्याचे दिवस आणि लगीन घाई यामध्ये त्वचा चमकदार करण्यासाठी महिला अनेक फेशियल करून घेतात. हे फेशियल कधी कधी खूप महाग असतात. तसेच या फेशियलमध्ये अशा हानिकारक घटकांचा वापर देखील केला जातो, ज्यामुळे त्वचेसोबत आरोग्यालाही हानी पोहोचते.
जर तुम्हाला तुमच्या चेहऱ्याची चमक नैसर्गिकरित्या वाढवायची असेल किंवा तुमच्या चेहऱ्यावर ग्लो आणायचा असेल तर तुम्ही आइस वॉटर फेशियल नक्की करून पहा.
चला जाणून घेऊया घरच्या-घरी आईस वॉटर फेशियल कसे करावे आणि त्याचे फायदे काय आहेत-
- आईस वॉटर फेशियल करण्यासाठी प्रथम एका भांड्यात बर्फ गोळा करा.
- आता हा बर्फ फ्रीजमधून काढल्यानंतर एका मोठ्या पातेल्यात बर्फ काढा.
- जेव्हा बर्फ निघून जाईल आणि पाणी होईल तेव्हा या भांड्याच्या पाण्यात आपला चेहरा बुडवा.
- चेहरा काही सेकंदांसाठी बुडवून ठेवा.
- आपण हे 3-4 वेळा करू शकतो.
- यानंतर टॉवेल किंवा कापसाच्या मदतीने चेहरा पुसून घ्या.
- टॉवेलच्या मदतीने त्वचेवर बर्फाचे तुकडे देखील लावू शकता. आणि हळूहळू मसाज करू शकता.
- Advertisement -
- Advertisement -
आइस वॉटर फेशियलचे फायदे पुढीलप्रमाणे-
- चेहऱ्याची त्वच्या चांगली राहते तसेच चेहऱ्याची छिद्रे साफ होतात.
- चेहऱ्याचा सूज कमी होते. तसेच आईस फेशियलमुळे डोळ्यांभोवती सूज येण्याची समस्या दूर होते.
- आईस फेशियलमुळे चेहऱ्यावरील मुरुम कमी होतात.
- आईस फेशियल केल्याने चेहऱ्यावरील टॅनिंग दूर होते.