Friday, April 19, 2024
घरमानिनीपरीक्षेचं टेन्शन आलंय? मग करा 'हे' उपाय

परीक्षेचं टेन्शन आलंय? मग करा ‘हे’ उपाय

Subscribe

मार्च महिना जसजसा जवळ येऊ लागतो तसतसा पालक आणि पाल्य या दोघांचाही तणाव खूप वाढलेला दिसून येतो कारण असते ते म्हणजे वार्षिक परीक्षांचे. फेब्रुवारी दरम्यान तर बोर्डाच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा स्ट्रेस असतो हे आम्ही तुम्हाला सांगायची गरज नाही. काहींना तर इतका स्ट्रेस येतो की, अभ्यास होऊनही परीक्षेदरम्यान ते गोंधळून जातात. काहींना तर अभ्यासच करावा वाटत नाही. पण तुम्ही काही सोप्या टिप्स फॉलो केल्यात तर तुम्ही सहज परीक्षा देऊ शकाल आणि तुम्हाला टेन्शनही येणार नाही.

नियोजन बनवून ते फॉलो करा –
परीक्षेपूर्वी अभ्यासाचे नियोजन हे महत्वाचे असते. यासाठी तुम्ही अभ्यासाचे आणि तुमच्या इतर वेळचे व्यवस्थित नियोजन करायला हवे. परीक्षेचा अभ्यास हा कधीच एका दिवसात होत नाही. तुम्ही दररोज थोडा थोडा अभ्यास केलात तर तुम्हाला परीक्षेआधी टेन्शन आणि स्ट्रेस जाणवणार नाही. याशिवाय महत्वाचे म्हणजे पूर्ण झोप घ्या. अनेक जणांना रात्री उशिरा पर्यत जागे राहून अभ्यास करण्याची सवय असते. पण, असे केल्याने तुमच्या मानसिक आरोग्यासोबतच शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

- Advertisement -

निगेटिव्ह एनर्जी काढून टाका –
परीक्षेआधी टेन्शनमुळे मनात आणि डोक्यात अनेक विचार येऊ शकतात. मला हे आठवेल का ? मला ३ तासात पेपर लिहिता येईल ना? असे एका ना अनेक प्रश्न मनात घर करू लागतात. त्यामुळे सर्व निगेटिव्ह विचार काढून टाकण्याचा पर्यंत करा. अभ्यासातून अधूनमधून ब्रेक घ्या. मग तुम्ही यासाठी मेडिटेशनची सुद्धा मदत घेऊ शकता.

नोट्स बनवा –
अभ्यास लक्षात राहत नसेल तर पॉइंटर्स काढून नोट्स बनवा. नोट्स काढल्याने अभ्यासाचे नियोजन करताना सोप्पे जाते. तुम्ही हायलायटरची सुद्धा मदत घेऊ शकता. मुद्दे ठळक केलेत तर रिविजन करताना महत्वाचे पॉईंट्स सहज लक्षात येतील.

- Advertisement -

आहाराकडे लक्ष द्या –
कधी कधी अभ्यासाच्या नादात आहाराकडे दुर्लक्ष होते. पण, असे केल्याने शारीरिक स्वस्थ बिघडू शकते. त्यामुळे निरोगी खाणे आणि पूर्ण झोप घेणं आवश्यक असते. याशिवाय व्यायाम करायला विसरू नका.

कल्पना करणे –
परीक्षेपूर्वी आणि परीक्षेदरम्यन, शांत आणि आत्मविश्वासाने राहण्यासाठी दीर्घ श्वासोच्छवास, स्नायूंना आराम देणे, डोळ्यांचा व्यायाम, सकारात्मक परिणामाची कल्पना करणे यासारख्या विश्रांती तंत्राचा सराव अवश्य करावा.

शिस्त बनवून त्याचे पालन करा –
परीक्षेदरम्यन, ध्येय, उद्दिष्ट्ये आणि सराव या तीन गोष्टी खूप उपयुक्त ठरतात. वेळापत्रक बनवून ते फॉलो करा. असे केल्याने तुम्हाला परीक्षेचं टेन्शन जाणवणार नाही. स्वतःला शिस्त लावून त्याचे पालन अवश्य करा.

 

 

 


हेही वाचा : परीक्षेवेळी मुलांना द्यावा ‘हा’ हेल्थी डाएट

- Advertisment -

Manini