आपण अनेकदा लिंबाचा रस पितो. लिंबू जेवणामध्ये पदार्थाची चव वाढवण्यासाठीही वापरले जाते. लिंबात बायोएक्टिव्हचे प्रमाण जास्त असल्याने ते शरीरासाठी उपयुक्त असते. लिंबू शरीरातील क्षार आणि पोषक तत्त्वांची कमतरता भरून काढते. लिंबामध्ये पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, क्लोरिन आणि प्रथिने, चरबी हे देखील पुरेशा प्रमाणात असल्याने ते शरीराला फायदेशीर असतात. तसेच लिंबात ए, बी, आणि सी जीवनसत्त्वे खूप प्रमाणात असतात. मात्र, लिंबाचे जास्त सेवन देखील शरीरासाठी घातक ठरु शकते.
लिंबाचे जास्त सेवन ठरु शकते घातक
- दातांचा त्रास
लिंबामध्ये सिट्रस अॅसिड असते. ज्याचा दातांशी जास्त संपर्क आल्याने दात संवेदनशील होतात. जर तुम्हाला लिंबूपाणी प्यायचे असेल तर स्ट्रॉने प्या. ज्यामुळे पाण्याचा स्पर्श दातांना होणार नाही.
- छातीमध्ये जळजळ
जर तुम्हाला अॅसिडची समस्या असेल तर लिंबूचे सेवन कमी करा. यामध्ये जास्त अॅसिड असते. यामुळे तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो.
- पोटाची समस्या
अनेकदा लोक अन्न पचवण्यासाठी लिंबाच्या रसाचे सेवन करतात. कारण यामधील अॅसिड अन्न पचवण्यास मदत करते. परंतु पोटात जास्त अॅसिड झाल्याने पोट खराब होते. यामुळे लिंबू नेहमी जेवणात मिसळुनच सेवन करावा.
- किडनी आणि पित्ताशयाची समस्या
लिंबामध्ये अॅसिड सोबतच ऑक्सलेटसुध्दा असते. हा क्रिस्टलाइज्ड ऑक्सलेट, किडनी स्टोन आणि गॉलस्टोनची जागा घेऊ शकतो.
- डीहायड्रेशन
लिंबूपाणी प्यायल्याने वेळोवेळी मुत्रविसर्जन करावे लागते. ज्यामुळे बॉडीमध्ये डीहायड्रेशन होऊ शकते. यामुळेच तुम्ही जेव्हा लिंबूपाण्याचे सेवन कराल तेव्हा नंतर थोड्या वेळाने पाणी पित राहा.
हेही वाचा :