Sunday, February 25, 2024
घरमानिनीHealthवयानुसार करावा असा व्यायाम, नाहीतर वाढेल त्रास

वयानुसार करावा असा व्यायाम, नाहीतर वाढेल त्रास

Subscribe

हेल्दी राहण्यासाठी व्यायाम करणे फार महत्त्वाचे मानले जाते. दररोज व्यायाम केल्यास काही आजारांपासून आपण दूर राहतो. मात्र वाढत्या वयासह नक्की कसा व्यायाम करावा हे काहींना कळत नाही. अशातच कोणत्या वयात कोणता व्यायाम केला पाहिजे याच बद्दल जाणून घेऊयात.

16-20 वयोगटातील व्यक्तींनी असा करा व्यायाम

- Advertisement -


स्ट्रेंथ ट्रेनिंग ही केवळ मुलच नव्हे तर मुली सुद्धा करु शकतात. यामुळे स्नायू बळकट होतात. जर तुम्हाला फिट रहायचे असल्यास आणि या वयोगटातील असाल तर नक्की स्ट्रेंथ ट्रेनिंग करु शकता. यासाठी तुम्ही एरोबिक्सची मदत घेऊ शकता.

25-40 वयोगटातील व्यक्तींनी असा करा व्यायाम

- Advertisement -


या वयोगटातील व्यक्ती करियरकडे अधिक फोकस करतात. अशातच ते ओवर टाइम काम ही करतात. यामुळे बसण्याचे पोश्चर ही बिघडले जाते आणि काही आजार मागे लागतात. त्यामुळे हाय इंटेन्सिटी वर्कआउट तुम्ही करु शकता. हाय इंटेन्सिटी ट्रेनिंगमुळे तुमचे वजन ही लवकर कमी होईल आणि तुम्ही फिट राहता.

50-60 वयोगटातील व्यक्तींनी असा करा व्यायाम


या वयोगटातील व्यक्तींनी ताई ची प्रकारचा व्यायाम करावा. हा व्यायामाचा प्रकार आरोग्यासाठी फायदेशीर मानला जातो. या व्यायामामुळे शरिराचे संतुलन राहते आणि लवचीकपणा ही येतो.


हेही वाचा- Physical Activity न केल्याने होऊ शकतात हे गंभीर आजार

- Advertisment -

Manini