Monday, March 17, 2025
HomeमानिनीHealth Tips : चांगल्या झोपेसाठी करा एक्सरसाइझ

Health Tips : चांगल्या झोपेसाठी करा एक्सरसाइझ

Subscribe

आजच्या धकाधकीच्या जीवनात ताणतणाव खूप वाढत चालेला आहे. त्यामुळे आपली झोप देखील होत नाही, झोप न झाल्यामुळे आपल्याला अनेक आजरांना सामोरे जावे लागते. चांगल्या आरोग्यासाठी झोप खूप महत्वाची असते. बऱ्याचदा वाढत्या ताणतणावामुळे आपल्याला चांगली झोप देखील येत नाही. त्यामुळे आज आपण चांगल्या झोपेसाठी कोणती एक्सरसाइझ करू शकतो ते जाणून घेऊयात.

झोप सुधारण्यासाठी तुम्ही काही विशिष्ट एक्सरसाइझ आणि योगासने करू शकता. यामुळे शरीर आणि मन शांत होऊन तुम्हाला चांगली झोप लागेल.

स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सेशन एक्सरसाइझ

स्ट्रेचिंग आणि रिलॅक्सेशन एक्सरसाइझ केल्यामुळे झोप चांगली लागते. हे स्नायूंना आराम देण्यास मदत करते आणि शरीरातील ताण देखील कमी होतो. यामुळे मान आणि खांद्यांचा ताण कमी होतो. हिप आणि मांडीचे स्नायू मोकळे होतात.रक्ताभिसरण सुधारते आणि शरीर शांत होते.

हलकी कार्डिओ एक्सरसाइझ

झोपण्याच्या 2-3 तास आधी हलक्या स्वरूपातील व्यायाम केल्यास शरीर थकून झोप लवकर येते.रोज 30 मिनिटे चालायला चालणे. हलक्या गतीने 15-20 मिनिटे सायकलिंग करणे. सायकलिंग व्यतिरिक्त तुम्ही डान्स देखील करू शकता.

बालासन

बालासन केल्यामुळे मेंदू शांत होतो आणि तणाव कमी होतो.स्नायू मोकळे होतात आणि झोप लवकर येते.रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा दूर होतो.शवासन केल्याने पूर्ण शरीर विश्रांतीच्या स्थितीत जाते आणि मेंदू शांत होतो. योगासोबत प्राणायाम केल्यास झोप पटकन येण्यास मदत होते.

अनुलोम-विलोम प्राणायाम

अनुलोम-विलोम प्राणायाम केल्यामुळे मन शांत होते आणि ऑक्सिजन सप्लाय सुधारतो. 4-7-8 ब्रीदिंग टेक्निक – 4 सेकंद श्वास घेणे, 7 सेकंद थांबवणे आणि 8 सेकंद श्वास सोडणे यामुळे झोप लवकर येते.

हेही वाचा : Licorice (Jeshthamadh) : जेष्ठमध खाल्ल्याने होतात हे आजार दूर


Edited By : Prachi Manjrekar

Manini